इजिप्तच्या राणीच्या रहस्यमय आयुष्याबद्दल जाणून घ्या काही गोष्टी

एका राणीबद्दल सांगणार आहोत, जी सुंदर दिसण्यासाठी असं काही करत होती की ते ऐकून तुम्हाला किळस वाटेल. 

Updated: Jul 24, 2022, 07:39 PM IST
इजिप्तच्या राणीच्या रहस्यमय आयुष्याबद्दल  जाणून घ्या काही गोष्टी title=

Trending News: लहानपणा आपण आजीकडून राजाराणीचे अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. या राजा किंवा राणींनी आपल्या शक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जगात ते प्रसिद्ध होते. आज आम्ही तुम्हाला अशा एका राणीबद्दल सांगणार आहोत, जी सुंदर दिसण्यासाठी असं काही करत होती की ते ऐकून तुम्हाला किळस वाटेल. या जगातील सुंदर आणि हुशार राणीने एकट्याने राज्य केलं. या राणीचं नाव होतं क्लियोपात्रा. या राणीने इजिप्तवर राज्य केलं. मात्र तिच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्याने हा देश ताब्यात घेतला. या युगात क्लियोपात्रा ही जगातील सर्वात सुंदर राणी म्हणून प्रसिद्ध होती. असं म्हणतात तिचं सौंदर्य टिकवण्यासाठी रोज 700 गाढवांच्या दुधाने आंघोळ करायची. क्लिलोपात्रा ही सुंदर तर होतीच पण ती फार हुशारही होती. 

8 भाषांचे ज्ञान

ग्रीक रिपोर्टरच्या रिपोर्टनुसार, क्लियोपात्रा इजिप्शियन भाषा शिकणारी पहिली टॉलेमी शासक होती. त्याआधी या राज्यातील लोकं फक्त ग्रीक बोलत होते. या राणी 8 भाषांचं ज्ञान होतं. इथिओपियन, हिब्रू, अरामी, अरबी, सिरीयक, मिडियन, पार्थियन आणि लॅटिन ही राणी बोलत होती. 

वडिलांच्या निधनानंतर बनली राणी

क्लियोपेट्रो हे नाव प्राचीन ग्रीक शब्द kléosवरुन आला आहे. क्लियोपेट्रो अर्थ म्हणजे गौरव असा होतो. क्लियोपात्राचे वडील टॉलेमी बारावे होते. तर क्लिओपात्राची आई व्ही ट्रायफेन होती. जेव्हा वडील टॉलेमी यांचं निधन तेव्हा क्लियोपात्रा फक्त 18 वर्षांची होती. 

लोकांचे रहस्य जाणून घेण्यात होती माहीर

क्लियोपात्रा ही उत्कृष्ठ राजकारणी, संवाद कौशल्य आणि सतत बदलण्याची क्षमता असलेली राणी होती. त्यामुळे प्राचीन काळात राज्य करणारी ती एकमेव महिला राणी होती. ती एक चतुर राणी होती त्यामुळे ती कोणाशीही सहज कनेक्ट व्हायची आणि त्याचे सर्व गुपित ती जाणून घ्यायची. ती पुरुषांशी संबंध करुन त्यांचे गुपित जाणून घेण्यात माहीर होती. 

39 वर्षी घेतला जगाचा निरोप

राणी क्लियोपात्रा हिचं निधन वयाच्या 39 वर्षी झालं. मात्र तिच्या मृत्यू कारण आजही जगासाठी एक रहस्य आहे. तर या राणीचं नाव इतिहासात एक रहस्यमय व्यक्ती म्हणून नोंदविण्यात आलं आहे.