बिल गेट्स यांनी देखील लुटलाय आयुष्याचा आनंद; कसं होतं गेट्स यांचं आयुष्य?

कसं होतं गेट्स यांचं आयुष्य?   

Updated: May 11, 2021, 10:19 PM IST
बिल गेट्स यांनी देखील लुटलाय आयुष्याचा आनंद; कसं होतं गेट्स यांचं आयुष्य?

मुंबई : बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांचं नातं संपलं आहे. याच दरम्याम त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणाऱ्या जेम्स वॉलेस यांनी  बिल गेट्स यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 80 आणि 90 च्या दशकात बिल गेट्स यांचं आयुष्य नक्की असं होतं. यावर सविस्तर खुलासा केला आहे. युके येथील 'डेली मेल'शी संवाद साधताना  जेम्स वॉलेस  यांनी म्हटलं, 'पूर्वी मायक्रोसॉफ्टसाठी काम करणारी मुलं  अनेक दिवस एकाचं कोडींवर काम करत असायचं.'

पुढे  जेम्स वॉलेस  म्हणाले 'कोडींग पूर्ण झाल्यानंतर मात्र ते जोरदार पार्टी करत असायचे. या पार्टीमध्ये ते सिऍटलमधील स्टीपर्स देखील आणयचे. महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी बिल गेट्सच्या घरी देखील स्टीपर्स घेवून जायचे. बिल गेट्स कायम कोडींगमध्ये व्यस्त नसायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटला आहे.'

तर महिलांसोबत असलेल्या नात्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक संकटं उभी राहिली होती. 'बिल गेट्स यांनी मेलिंजा यांना 1998 पासून डेट करण्यास सुरूवात केली. पण जेव्हा बिल कामाच्या निमित्ताना बाहेर असायचे. तेव्हा त्यांच्या पत्नीला त्यांचं असं रूप पाहायला मिळायचं. मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या कंपनीसाठी कम करणाऱ्या पहिला पत्रकारांशी त्यांची जवळीक असायची. ' असा देखील खुलासा  जेम्स वॉलेस यांनी केला आहे.