होस्टेल Bossने सांगितलं - माझ्या आणि माझ्या Girlfriendसोबत झोपावं लागेल, युवतीने सांगितली घडलेला प्रकार

वसतिगृहाचं भाडं न भरल्याने ती बॉस च्या जाळ्यात अडकली होती

Updated: Apr 18, 2021, 10:44 PM IST
होस्टेल Bossने सांगितलं - माझ्या आणि माझ्या Girlfriendसोबत झोपावं लागेल, युवतीने सांगितली घडलेला प्रकार

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये वीजाचा नियम बदल्यांना एका युवतीला खूप त्रास सहन करावा लागला. पीडित महिला ऑस्ट्रेलियामध्ये वर्क वीजासाठी विक्टोरियातील एका वसतिगृहात राहत होती. तिथे वसतिगृहातील बॉसने तिला आणि त्याच्या गर्लफ्रेंन्डसोबत झोपायला सांगितलं. तिने तसं न केल्यास तिच्यावर बलात्कार करण्याची धमकीही त्याने तिला दिली.

या कारणामुळे हॉस्टेलमध्ये रहायला मजबूर झाली युवती
एका वृत्तानुसार महिलेने सांगितले की ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्या वर्षाच्या वर विजा मिळवण्यासाठी तिला तिथे 28 दिवस घालवायचे होते. यामुळे ती होस्टेलमध्ये राहत होती परंतु आर्थिक चणचण निर्माण झाल्याने ती तिथून येवू शकली नाही. अशा परिस्थितीत वसतिगृहातील बॉसने तिला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं        

मुलगी म्हणाली की, कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला ऑस्ट्रेलिया वर्क विजा घ्यायचा होता. मुलगी म्हणाली की, तिला तिच्या होस्टेलच्या बॉस कडून याची अपेक्षा देखील नव्हती की, वसतिगृहाचं भाडं न भरल्याने ती बॉस च्या जाळ्यात अडकली होती.                          

बॉसने युवती समोर ठेवली ही अट
बॉसने त्या युवतीला ऑफिस मध्ये बोलवून तिच्यासमोर एक डिल ठेवली. यामध्ये आरोपीने तिला सांगितलं की, तुला माझ्या गर्लफ्रेंड सोबत आणि माझ्यासोबत झोपावं लागेल. नाहीतर आम्ही तुझा रेप करू. या दोघांपैकी एक पर्याय तु निवडू शकतेस. त्या महिलेने क्षणाचाही विचार नं करता आरोपीच्या ऑफिसमधून निघाली आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे धाव घेतली.