पठ्ठ्याने घरच्या घरी बनवलं हेलिकॉप्टर आणि सुरक्षित उतरवलंही

एका व्यक्तीने घरातील टाकाऊ गोष्टींच्या सहाय्याने चक्क हेलिकॉप्टर बनवलं आहे.

Updated: Dec 12, 2021, 03:45 PM IST
पठ्ठ्याने घरच्या घरी बनवलं हेलिकॉप्टर आणि सुरक्षित उतरवलंही title=

ब्राझील : तुमच्या घरात काही टाकाऊ गोष्टी असतील तर तुम्ही त्या टाकून देताय का? आम्ही हे तुम्हाला सांगतोय कारण एका व्यक्तीने घरातील टाकाऊ गोष्टींच्या सहाय्याने चक्क हेलिकॉप्टर बनवलं आहे. ब्राझीलमध्ये राहणारा जेनेसिस गोम्स याने हे हेलिकॉप्टर तयार केलं आहे. 

गोम्सचं हे टॅलेंट तेव्हा समोर आलं जेव्हा त्याने स्वतः बनवलेलं हेलिकॉप्टर उडवलं. हेलिकॉप्टर उडवलं असता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी व्हीडियो शूट केला. आणि पाहता पाहता हा व्हीडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हीडियो व्हायरल झाल्यानंतर सर्वजण जेनेसिसला शुभेच्छा देऊ लागले.

असं बनवलं जेनेसिसने हेलिकॉप्टर

वायरल व्हीडियोमध्ये असं दिसतंय की त्याने घरातील काही गोष्टी आणि खराब गाडीच्या काही भागांचा वापर करून हे हेलिकॉप्टर तयार केलं आहे. आणि हेच हेलिकॉप्टर जेनेसिस गोम्सने हवेत उडवलं आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये वोक्सवॅगन बीटलचं इंजिन लावण्यात आलं असल्याची माहिती आहे. लोकल न्यूजच्या माहितीप्रमाणे, त्याचप्रमाणे मोटर सायकल, ट्रक, सायकल आणि कार यांचे पार्टसही वापरण्यात आले आहेत.

जेनेसिसला लहानपणापासून हेलिकॉप्टरची आवड

लहानपणापासून जेनेसिसला हेलिकॉप्टरची आवड होती. मात्र त्याची इच्छा असूनही ती पूर्ण झाली नाही. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने घरात असलेल्या सामानाने हेलिकॉप्टर बनवलं आहे.