भारत-चीन वाद ते कोरोना व्हायरस, संयुक्त राष्ट्र महासभेत जिनपिंग काय म्हणाले?

भारत आणि चीन यांच्यात मागच्या ६ महिन्यांपासून लडाख सीमेवर तणाव आहे.

Updated: Sep 22, 2020, 11:06 PM IST
भारत-चीन वाद ते कोरोना व्हायरस, संयुक्त राष्ट्र महासभेत जिनपिंग काय म्हणाले?

मुंबई : भारत आणि चीन यांच्यात मागच्या ६ महिन्यांपासून लडाख सीमेवर तणाव आहे. या सीमा वादावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं वक्तव्य समोर आलं आहे. देशांमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे. पण या मतभेदांना चर्चा आणि सल्ला मसलत करून सोडवणं महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य जिनपिंग यांनी केलं.

संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना जिनपिंग म्हणाले, 'व्हायरसला आपण हरवू, पण व्हायरसच्या नावावर कोणत्याही देशाला कलंकित करण्याच्या प्रयत्नांना स्विकारता कामा नये,' अशी प्रतिक्रियाही जिनपिंग यांनी दिली. 

भारत-चीन सीमा वादावर बोलताना जिनपिंग म्हणाले, 'दोन्ही देशांमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे. पण मतभेदांना चर्चा आणि सल्ला मसलत करून सोडवणं महत्त्वपूर्ण आहे.'

'चीन जगातला सगळ्यात मोठा शांतता प्रिय देश आहे. आम्ही कधीही आपल्या विस्तारासाठी किंवा प्रभावासाठी कोणत्याही देशाशी युद्धाला सुरुवात करणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून मतभेद कमी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवू,' असं जिनपिंग बोलले.