बिल गेट्स यांनी Secret Santa होऊन 'तिला' इतक्या भेटवस्तू दिल्या की...

एक सिक्रेट सँटा असाही..... 

Updated: Dec 30, 2019, 01:46 PM IST
बिल गेट्स यांनी Secret Santa होऊन 'तिला' इतक्या भेटवस्तू दिल्या की... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मिशिगन : Christmas 2019 नाताळचं स्वागत केल्यानंतर जगाच्या प्रत्येक भागामध्ये या सणाचा उत्साह पाहायला मिळाला. सानथोरांपासून प्रत्येकाच या सणाची उत्सुकता असते आणि याच उत्सुकतेमध्ये एक प्रकारची आतुरताही असते. ही आतुरता असते सँटाक्लॉज, म्हणजेच नाताळबाबाला भेटण्याची. दूरवरचा प्रवास करुन कोण कुठचा नाताळबाबा येऊन आपल्याला नेमकी काय भेट देणार हा अनेकांनाच पडलेला प्रश्न. 

नाताळबाबा, एक अशी सकल्पना जी प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आनंद आणून जाते. आधुनिक विश्वात धकाधकीच्या आयुष्यामध्येही नाताळबाबा म्हणजेच सँटाच्या स्वागताचा विसर कोणालाही पडत नाही. ख्रिसमसच्या या धामधुमीमध्ये सध्या अनेक कार्यालयांपासून ते अगदी घरोघरी एक खेळ खेळला जात आहे. तो खेळ म्हणजे सिक्रेट सँटा. Secret Santa. 

आपलं नाव कोणारा येणार आणि कोणत्या अनोखळी व्यक्तीकडून आपल्याला भेट देणार याचीच उत्सुकता या खेळात शिगेला पोहोचलेली असते. या अतिशय धमाल अशा खेळाने सध्या संपूर्ण जगभरात अनेकांचं लक्ष वेधलं आहे. कारण, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, खुद्द Bill Gates बिल गेट्स यांनी सिक्रेट सँटा होऊन एका महिलेला काही अफलातून भेटवस्तू दिल्या आहेत. ज्या महिलेला या भेटवस्तू मिळाल्या आहे, तिचाही यावर प्रथमत: विश्वास नव्हता. पण, ही बाबा तिला आश्चर्याचा धक्काच देऊन गेली हे खरं. 

Reddit 'रेडइट' गिफ्ट्सच्या 'सिक्रेट सँटा' या स्पर्धेत मिशिगन येथील एका ३३ वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. बिल गेट्सही या स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून सहभागी होत आहेत. पण, कधी ते आपल्याला सिक्रेट सँटा होऊन अशा काही अद्वितीय भेटवस्तू देतील अशी कल्पनाही नसल्याचं म्हणत शेल्बीने आनंद व्यक्त केल्याचं वृत्त सीएनएनने प्रसिद्ध केलं आहे. 

शेल्बीला मिळालेल्या भेटवस्तूमधील काही गोष्टी..... 

बिल गेट्स यांच्याकडून शेल्बीसाठी आलेल्या भेटवस्तूंमघ्ये हॅरी पॉर्टर सॅण्ट हॅट, हॉगवर्ड्स कॅसल,  (बऱ्याच काळापासून विक्रीसाठी बंद असणारं) आरटूडीटू पझल, हॅरी पॉर्टर आणि स्टारवॉर्ल लिगो सेट, हाताने विणलेलं एक ब्लँकेट, ट्विन पिक्स शोसंदर्भातील भेटवस्तू, एल. एल. बीन जॅकेट, ट्विन पिक्सचं दुसरं पर्व, द ग्रेट गॅट्सबे हे पुस्तक तसंच हे पुस्तक लिहिणारे लेखक एफ स्कॉट फित्झरलॅड यांनी स्वत: लिहीलेली चिठ्ठी, खूप सारे ओरिओ बिस्कीटचे बॉक्स आणि इतर अनेक लहानमोठ्आ भेटवस्तूंचा जणू ढिगच तिच्यासाठी पाठवण्यात आला होता. 

१७ डिसेंबरला शेल्बीला तिच्या या खास भेटवस्तूविषयीची माहिती मिळाली. आपली भेटवस्तू वॉशिंग्टनहून येणार असल्याची माहिती मिळाली, तेव्हा ही भेट बिल गेट्सच पाठवणार वाटतं.... असं शेल्बेने तिच्या पतीला सांगितलं. ज्यावेळी तिने प्रत्यक्ष ही भेटवस्तू पाहिली तेव्हा ती अवाकच झाली. ८१ पाऊंड म्हणजे जवळपास ३७ किलो असं त्या भेटवस्तूचं वजन होतं. खरोखरंच ही बिल गेट्स यांनी पाठवल्याचा विचार तिच्या मनात आला. त्या क्षणापर्यंतही शेल्बीला काही कल्पनाच नव्हती. पण, ती जेव्हा फेडएक्सच्या कार्यालयात गेली तेव्हा तेथील कर्मचारी या भेटवस्तूबद्दल प्रचंड उत्सही असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याच ठिकाणी आपल्याला खरोखरच बिल गेट्स यांनी सिक्रेट सँटा होऊन भेट दिल्याचं तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

यंदाच्या वर्षी शेल्बीने बऱ्याच आव्हानांचा सामना केला होता. एप्रिल महिन्यात तिच्या लग्नाच्या दहा दिवसांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं होतं. तिच्यासाठी आलेल्या या भेटवस्तूंच्या पेटाऱ्यामध्ये आईसाठीसुद्धा खास गोष्ट होती. एका अनोळखी आणि विश्वविख्यात व्यक्तीकडून आपल्याला आलेल्या या भेटवस्तू शेल्बीला भलत्याच आनंदाच्या शिखरावर ठेवून गेली. सोबतच कोणा एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी ओळखीचीच गरज असते ही समजही बिल गेट्सरुपी सिक्रेच सँटाने खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचवला आहे, असं म्हणायला हरकत नाही.