लंडन : लंडनच्या एरवी शांत असलेल्या रस्त्यांवर शुक्रवारी भारतीय शक्तीचं दर्शन झालं.
मुळचे पाकिस्तानी वंशाचे लॉर्ड नाझीर अहमद यांनी काश्मीर प्रश्नावरून प्रजासत्ताक दिनी भारतीय उच्चायुक्तालयावर मोर्चा काढला.
याला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या भारतीय वंशाच्या नागरिकांनीही उच्चायुक्तालयाकडे धाव घेतली.
तिरंगा फडकवत तसंच दहशतवाद आणि पाकिस्तानच्या निषेधाचे फलक घेऊन शेकडो भारतीय नागरिक रस्त्यावर उतरले.
#WATCH Clashes erupted outside Indian High Commission in London as British Lord Nazir called for Azad Kashmir on India's Republic Day pic.twitter.com/IJQb3XajIu
— ANI (@ANI) January 26, 2018
यावेळी दोन्ही मोर्चे समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
खरंतर नाझीर यांची २१३ मध्ये वंशभेदी टिप्पणी केल्यानंतर मजूर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. त्यामुळे भारतीय उच्चायुक्तालयावर मोर्चा काढण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न म्हणजे आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयानं दिलीय.