Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Updated: Jan 2, 2023, 12:59 PM IST
Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का? title=
Croatia welcomes 2023 by joining Eurozone and Schengen area international news marathi

Croatia Currency :  भारतात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court verdict on Demonetisation) नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय देत या निर्णयाविरोतील तब्बल 58 यचिका फेटाळल्या. देशातील सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला असतानाच आता चलनांशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जिथं एका नव्या चलनाचा स्वीकार जगातील या देशानं केला आहे. 

आता पासपोर्टची गरज नाही... 

हा देश म्हणजे क्रोएशिया (Croatia). युरोला (Euro) आपल्या चलनात समाविष्ट करुन घेणारा क्रोएशिया आणखी एक देश ठरला आहे. 1 जानेवारी 2023 ला मध्यरातीर जवळपास 40 लाख इतकी लोकसंख्या असणआऱ्या क्रोएशियानं कुना या त्यांच्या चलनाला अलविदा करत युरोचा स्वीकार केला. युरोझोनमध्ये (Euro zone) येणारा क्रोएशिया हा 20 वा सदस्य देश ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार युरोपीय संघामध्ये सहभागी झाल्याच्या साधारण एका दशकानंतर या बाल्कन राष्ट्राला युरोपच्या पासपोर्ट मुक्त शेंगन क्षेत्रात समाविष्ट करुन घेण्यात आलं आहे. (Croatia welcomes 2023 by joining Eurozone and Schengen area international news marathi)

schengen क्षेत्रात आतापर्यंत 26 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. जिथं जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता भासत नाही. थोडक्यात या 26 राष्ट्रांमधील नागरिक पासपोर्टशिवाय एकमेकांच्या राष्ट्रांत प्रवास, काम, वास्तव्य करु शकतात. यासाठी त्यांना व्हिसा किंवा कोणत्याही प्रकारच्या परमिटची आवश्यकता नसते. 

हेसुद्धा वाचा : Corona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी

आतापर्यंत यामध्ये बल्गेरिया, रोमानिया, क्रोएशिया, आयर्लंड आणि सायप्रस हे देश schengen चा भाग नव्हते. पण, आता क्रोएशियाचा समावेश या गटात झाला आहे. तर, आईसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि लिष्टनश्टाइन यांसारखे देश युरोपीय संघाचा भाग नसले, तरीही schengen क्षेत्राचा भाग आहेत. 

European Commission President Ursula von der Leyen यांनी क्रोएशियाच्या चलनात युरोचा समावेश होणं हे ऐतिहासिक यश असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. 

युरोच्या वापराचा क्रोएशियाला काय फायदा? 

क्रोएशियाकडून युरोचा वापर दैनंदिन चलनात केलं जाणं ही साधीसुधी बाब नसून, याचे थेट परिणाम देशाच्या राजकारणावर होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळं क्रोएशियाच्या अर्थव्यवस्थेवर याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. युरोचा वापर होणार असल्यामुळे या चलनाचा वापर करणाऱ्या इतर 19 राष्ट्रांसोबत आणि युरोपीय सेंट्रल बँकेसोबत असणाऱ्या आर्थिक संबंधांचा फायदा या देशाला होणार आहे.