Panda Video: पांडा खेळतानाचा व्हिडीओ पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू

तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? 

Updated: Jul 31, 2021, 03:23 PM IST
Panda Video: पांडा खेळतानाचा व्हिडीओ पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : सोशल मीडियावर दर दिवशी काही व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. देशविदेश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील हे व्हिडीओ पाहत असताना अनेकदा त्यांच्याबाबतची उत्सुकता आणि कुतूहल सर्वांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या व्हिडीओंपैकी एक म्हणजे प्राण्यांच्या दंगामस्तीचे व्हिडीओ. 

सध्या असाच एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पांडा (Panda), म्हणजे काहीसा आळशी प्राणी म्हणून ओळख असणारी ही सुपरक्यूट मंडळी दंगा करताना दिसत आहेत. बऱ्याचदा वीकेंड आला किंवा आळसावल्यासारखं वाटू लागलं की, पांडाचाच एखादा व्हिडीओ किंवा जिफ फाईल शेअर केल्या जातात. इतकंच नव्हे तर, काहीजण तर आपल्यालाही असा निवांत आणि टंगळमंग करत वेळ व्यतीत करायचा आहे, अशी अपेक्षाही अनेकजण व्यक्त करतात. 

Buitengebieden या अकाऊंटवरुन असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या (Happy Video) व्हिडीओमध्ये काही पांडा प्ले एरियामध्ये दिसत आहेत. एखाद्या बागेमध्ये गेलं असता घरसगुंडीवरुन जसं आळीपाळीने लहान मुलं खेळत असतात त्याचप्रमाणे हे पांडाही या घसरगुंडीवर धमाल करताना दिसत आहेत. 

पांडांची तुलना खोडकर आणि काहीशा सुस्त अशा लहान मुलांशी करत नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित येत आहे तर चक्क पांडाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठीही अनेकांनीच इच्छा व्यक्त केली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x