अखेर चीन झुकला, लडाख सीमेवरुन मागे सरकलं चिनी सैन्य : सूत्र

एलएसीवरील टेंट आणि गाड्या देखील हटवण्याचं काम सुरु

Updated: Jul 6, 2020, 01:30 PM IST
अखेर चीन झुकला, लडाख सीमेवरुन मागे सरकलं चिनी सैन्य : सूत्र

लडाख : गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणात एक महत्त्वाची बातमी पुढे येत आहे. लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी मागे जाण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या देखील मागे जात आहेत. पीएलए पीपी 14 येथून टेंट देखील काढण्याचं काम सुरु आहे. चिनी सैन्य गलवान, हॉटस्परिंग आणि गोगरा सीमेवर मागे जाताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अजून हे स्पष्ट झालेलं नाही की, चिनी सैन्य किती किमी मागे गेले आहेत.

LAC वर भारताची कडक भूमिका आणि तयारी यामुळे चीनला झुकावं लागलं आहे.  गलवानमध्ये जेथे भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झडप झाली होती. त्या ठिकाणाहून देखील चिनी सैन्य मागे जात असल्याची माहिती मिळत आहे. LAC वर चिनी आर्मीचे टेंट देखील काढले जात आहेत. अधिकृत आणि सविस्तर माहिती अजून पुढे आलेली नाही.