पायावर काळे-निळे चट्टे उठले, डॉक्टरांनाही निदान सापडलं नाही, अखेर नऊ दिवसांनी मुलीचा मृत्यू

Blood Clot In Leg: पायावर काळे-निळ्ळे चट्टे उठल्यावर एका मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हीच चूक तिच्या जीवावर बेतली आहे. नऊ दिवसांनी तिचा मृत्यू झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 31, 2023, 05:50 PM IST
पायावर काळे-निळे चट्टे उठले, डॉक्टरांनाही निदान सापडलं नाही, अखेर नऊ दिवसांनी मुलीचा मृत्यू title=
doctors failed to spot blood clot in gir leg after 9 days she died

Blood Clot In Leg: अनेकदा आपण अशा आजारांची नाव ऐकतो ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. पण हेच आजार नंतर जीवघेणे ठरतात. अनेकदा हाता-पायावर लाल-नीळे चट्टे उठलेले दिसतात. मात्र, ही एक सामान्य समस्या आहे समजून आपण तिकडे दुर्लक्ष करतो. पण हा निष्काळजीपणा नंतर जीववर उठू शकतो. शरिरावर लाल-निळे चट्टे उठणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अलीकडेच एका मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या पायावर एक अजब निशाण उठले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने नऊ दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला आहे. 

मुलीचे आई-वडिल तिला झालेल्या गंभीर आजाराबाबत आजा जमजागृती करत आहेत. त्यांच्या मुलीसोबत जो प्रकार घडला आणि त्यामुळं तिचा जीव गेला तसं इतर कोणासोबत घडू नये यासाठी ते लोकांना या आजाराबाबत माहिती देत आहेत. मुलीची आई जेन हिने दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी केटी क्वीन मार्गारेट विश्वविद्यालयात शिकत होती. एक दिवशी अचानक तिच्या पायावर निळ्या रंगाचा चट्टा उठलेला दिसला. एखाद्या किडा चावला असेल असा समज करुन तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हळूहळू दुखणं वाढू लागलं. शेवटी वैतागून ती डॉक्टरांकडे गेली. 

रुग्णालयात दोन डॉक्टरांनी तिच्या पायावर उठलेल्या चट्ट्यांची तपासणी केली. मात्र, त्याना तिला काय झालंय हेच समजलं नाही. त्यांनी तिला पेन किलरची एक गोळी दिली. पण त्यानंतर नऊ दिवसांनी केटीचा मृत्यू झाला. 

जेनने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मुलीला डीवीटी (deep vein thrombosis) नावाचा आजार झाला होता. यात नसांमध्ये वाहणारे रक्त गोठते. मुख्यतः पायांना हा आजार होतो आणि त्यामुळं चट्टे पडलेल्या जागेवर असह्य दुखायला लागते तसं सूज व ती जागा गरम पडते. कधी कधी दोन्ही पायांवर अशाप्रकारचे चट्टे उठतातय. साधारणतः मांडी व काखेत असे चट्टे उठतात. 

काही वेळानंतर जिथे दुखत असेल ती जागा लाल आणि नंतर हळहळू काळी होत जाते. त्याजागेवरील नशा कठोर होतात. तिथे स्पर्श केला तरी असह्य त्रास होतो. विषाप्रमाणे ते संपूर्ण शरिरात पसरत जाते आणि नंतर मृत्यू होतो, असं जेनीने म्हटलं आहे. 

केटीच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे की, या घटनेने आम्ही खूप दुखी आहेत डॉक्टरांनाही या आजाराविषयी माहिती नव्हती. त्यामुळं आम्ही इतर लोकांना या आजाराविषयी सतर्क करते. तसंच, स्कॉटिश सरकारने या आजाराविषयी एक समितीही गठित केली आहे. ही समिती अशा आजारांची माहिती गोळा करुन त्याची चौकशी करते. केटीची वडिल गॉर्डन यांना मागील वर्षी इंटरनेशनल सोसाइटी ऑन थ्रोम्बोसिस एंड हेमोस्टेसिस (ISTH) ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित केले होते. ही समिती या आजारांवर रिसर्च करते.