न्यूयॉर्क : एका व्हिडिओ क्लिपमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नेटिझन्सनी ट्रोल केले आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनाही ट्रोल कऱण्यात आले आहे.
व्हिडीओत, लष्कराच्या एका कार्यक्रमादरम्यान मेलानिया ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलवतात. त्यावेळी ते माईकपाशी येतात आणि मेलानिया यांच्याशी हस्तांदोलन करतात. त्यानंतर ट्रम्प मेलानिया यांना व्यासपीठावरुन खाली जाण्यासाठी इशारा करतात.
या व्हिडिओमध्ये असे काय आहे, ज्यामुळे जो ट्विटर यूजर्सना व्हिडीओ आवडला नाही. मात्र सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी, कशी ट्रोल होईल सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ट्रम्प यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पत्रकार कॅट्रिओना पेरी हीने आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. १८ हजार जणांनी तो रिट्विट केला असून ६५०० जणांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवत या विषयाला वेगळेच वळण दिले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून अमेरिकेच्या पहिल्या जोडप्याच्या संदर्भातील हा व्हिडिओ म्हणजे गंभीर गोष्ट असल्याचे म्हटले आहे. यामध्ये स्वतः मेलानियाही ऑकवर्ड झाल्याचे दिसत आहे.