४ विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध; मास्तरिण बाईंना ४० वर्षांचा कारावास

शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण, ज्ञानाचे धडे देऊन करून अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही. अमेरिकेतील एका मास्तरीनबाईंणी असेच धक्कादायक कृत्य केलंय. ज्यामुळे त्यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 25, 2017, 04:21 PM IST
४ विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध; मास्तरिण बाईंना ४० वर्षांचा कारावास title=

वॉशिंग्टन : शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण, ज्ञानाचे धडे देऊन करून अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही. अमेरिकेतील एका मास्तरीण बाईंनी असेच धक्कादायक कृत्य केलंय. ज्यामुळे त्यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.

घटना आहे अमेरिकेतील आरकन्सॉ येथील. इथल्या एका जेसी लॉनेव्ह गोलाइन नावाच्या एका मास्तरिण बाईंवर आपल्याच विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेसी लॉनेव्ह यांनी आपल्या राहत्या घरात एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध ठेवले. या मास्तरीण बाई कला विषय शिकवतात. विद्यार्थ्यांना कलेचे धडे द्यायचे सोडून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वेगळेच धडे गिरवले. पण, प्रकरण लपून राहिले नाही. इतर प्रकरणांप्रमाणे याही प्रकरणाचा भांडाफोड झालाच. मग पोलिसांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंद केला.

जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी जानेवारी ते एप्रिल २०१६ दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. फिर्यादी पक्षाने माहिती देताना म्हटले आहे की, जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्याविरूद्ध सुरूवातीला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जेसी लॉनेव्ह यांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले होते. पण, अल्पावधीत अनेक पालकांनी तक्रारी केल्या की, जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी केवळ एकाच नव्हे तर, अनेक विद्यार्थ्यांसोबत शारीरिक ठेवला आहे.

मास्तरिण बाईंना गुन्हा कबूल

दरम्यान, जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी आपल्यावरील काही अरोप सत्य असून, आपल्याला गुन्हा मान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, काही विद्यार्थ्यांनीही आपण जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यासोबत अश्लिल चर्चा करायचो असे म्हटले आहे. तर, एका विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी आपल्याला जबदरस्तीने घरी नेऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. दुसऱ्या एका विद्यार्थ्यांने आरोप केला आहे की, जेसी लॉनेव्ह यांनी आपल्याला त्यांचे नग्न छायाचित्र पाठवले होते.

प्रकरणाचा भांडाफो होताच शाळेनेही प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सध्या जेसी लॉनेव्ह गोलाइन यांचे निलंबन करण्यात आले असून, त्यांना शालेय अवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. १९ जून रोजी त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. प्रकरण न्यायालयात आहे. जेसी लॉनेव्ह सध्या पाच हजार डॉलर्सच्या बॉन्डवर जामीन मिळाला आहे. पण, त्या दोषी आढळल्या तर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना ४० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.