Lima airport: अरे बापरे... ट्रकची विमानाला धडक, विमानतळावर बर्निंग प्लेनचा थरार

LATAM Airlines : पेरुच्या लीमा विमानतळावर बर्निंग प्लेनचा थरार पाहायला मिळाला. अग्निशमन दलाच्या ट्रकची विमानाला धडक झाल्यानंतर विमानाला मोठी आग लागली.  

Updated: Nov 19, 2022, 11:57 AM IST
Lima airport: अरे बापरे... ट्रकची विमानाला धडक, विमानतळावर बर्निंग प्लेनचा थरार title=

Lima airport: Fire truck hits Plane on runway : पेरुच्या लीमा विमानतळावर बर्निंग प्लेनचा थरार पाहायला मिळाला. (Lima airport plane crash) अग्निशमन दलाच्या ट्रकची विमानाला धडक झाल्यानंतर विमानाला मोठी आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. या विमानामध्ये 102 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. (Lima's international airport struck a firetruck on the runway and caught fire)

विमानात 102 प्रवासी 

पेरुमध्ये उड्डाण घेताना विमानाचा ( LATAM Airlines plane) भीषण अपघात झाला. रनवेवर समोरुन आलेल्या अग्निशमन दलाच्या ट्रकची धडक विमानाला झाली आणि यात विमानानं पेट घेतला. रनवेवर बर्निंग विमान धावत होतं. यात अग्निशमन दलाच्या 2 जवानांचा मृत्यू झाला. विमानात 102 प्रवासी होते. पण, वेळीच खबरदारी बाळगल्याने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत. पेरुच्या लीमा एअरपोर्टवर ही दुर्घटना घडली. अग्निशमन विभागाचे जनरल कमांडर लुईस पोन्स ला जारा यांनी सांगितले की, दोन अग्निशमन दलाचे जवान ठार झाले. विमानाला ट्रकची धडक झाल्याने विमानाने पेट घेतला. यावेळी दोन अग्निशमन जवान ठार झाले आणि एक जखमी झाला. अपघात झाला तेव्हा विमान आणि अग्निशमनदलाचा ट्रक भरधाव होते. (अधिक वाचा -  रशियाकडून युक्रेनवर पुन्हा जोरदार हल्ले; क्षेपणास्त्र डागल्याने वीज यंत्रणा ठप्प, देश अंधारात)

 विमानातील प्रवासी आणि कर्मचारी सर्व सुरक्षित 

राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी ट्विट करुन अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. हे विमान लीमाच्या मुख्य विमानतळावरून पेरुव्हियन शहर ज्युलियाकाकडे जात होते. LATAM एअरलाइन्सने सांगितले की, त्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. फायर ट्रक धावपट्टीवर का होता हे कळले नाही. आमची टीम सर्व प्रवाशांची आवश्यक ती काळजी घेत आहे. प्रवासी हे चांगल्या स्थितीत आहेत. विमानातील प्रवासी आणि कर्मचारी सर्व सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, एक विचित्र घटना घडली. चक्क विमान पुलाखाली अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे विमान उडत नव्हतं तर विमानासारखं दिसणारी डिझाईन ही रेस्टारंट बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे कंपनीकडून एका ट्रकवरून दुसऱ्या ठिकाणी नेलं जात होतं. त्यावेळी विमानाची उंची जास्त असल्याने पुलाखाली अडकले. बऱ्याच प्रयत्नानंतर विमान आणि ट्रकही सुरक्षित बाहेर काढण्यात आला. ही घटना आंध्रप्रदेशच्या बापटला जिल्ह्यातील असल्याचं समोर आले आहे.