इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या गळचेपीनंतर पाकिस्तानात आता घबराट पसरली आहे. इम्रान खानला पंतप्रधानपदावरून हाकलण्यासाठी राजकीय वर्तुळात दबाव वाढायला सुरूवात झाली आहे. माजी अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी इम्रान खानला बालीश असं म्हटलं आहे. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा काडीचा अनुभव नसल्याचं झरदारी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान सातत्याने एकाकी पडला आहे. मात्र सद्या राजवटीत परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचं झरदारी यांनी म्हटलं आहे. इम्रान हा इतरांच्या सांगण्यावरून कामं करणारा असल्यामुळे परिस्थिती चिघळल्याचं झरदारी यांनी म्हटलं आहे. जैशने पुलवामा येथे केलेला हल्ला ही फार वाईट स्थिती असल्याचं स्वतः मुशर्रफ यांनीही म्हटलं आहे. याआधी आपल्यावरही जैशने हल्ला केल्याचं मुशर्रफ यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सरकारही सहभागी असेल तर हे माफी निंदास्पद आहे असं मुशर्रफ यांनी म्हटलं आहे.
आसीफ अली झरदारी यांनी म्हटलं की, 'माझ्या कार्यकाळात मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला झाला होता. मी हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळलं होतं. पण पंतप्रधान इम्रान खान अपरिपक्व आहेत. त्यांना नाही माहित की काय केलं पाहिजे. आम्ही आजही पाकिस्तानच्या आर्मीचं समर्थन करतो. जर भारताने त्यांच्या विरोधात काहीही योजना बनवली असेल तर आम्ही एकत्र लढू.' याआधी देखील झरदारी यांनी इम्रान खानवर टीका केली होती.
'जेव्हा तुम्ही अचानक पंतप्रधान बनता तर तुम्ही शिकलं पाहिजे. पीपीपीचे अध्यक्ष झरदारी यांचा मुलगा बिलावल भुट्टो झरदारी यांनी इम्रान खान हे संसदेच्या सत्रात समोर बसून बोलू देखील शकत नाही.' असं म्हटलं आहे.
2008 मध्ये मुंबई हल्ल्यात लश्कर-ए-तैयबाचा हात होता. तेव्हा झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. पोलिसांनी जेव्हा कसाबला अटक केली तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की, पाकिस्तानातून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री कोंडोलीजा राइस यांनी आश्वासन दिलं होतं की, त्यांचं सरकार मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करेल.