close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

१६ वर्षांची ही तरुणी बनलीय जगभरातील पर्यावरणवाद्यांचा चेहरा

'तुम्ही आमची स्वप्न, आमचं बालपण आपल्या अर्थहिन शब्दांनी हिरावून घेतलंत. तुमची हिंमतच कशी झाली?'

Updated: Sep 24, 2019, 12:46 PM IST
१६ वर्षांची ही तरुणी बनलीय जगभरातील पर्यावरणवाद्यांचा चेहरा

न्यूयॉर्क : अवघ्या १६ वर्षांची मुलगी आज जगभरातील पर्यावरणवाद्यांचा चेहरा बनलीय. ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) असं या मुलीचं नाव आहे. ग्रेटा ही स्वीडनची रहिवासी आहे. संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय जलवायु संमेलनात सोमवारी केलेल्या आपल्या भाषणामुळे ग्रेटाचं नाव आज जगभरात गाजतंय. संयुक्त राष्ट्रात हवामान बदलासंदर्भात (Climate Change) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणापूर्वी १६ वर्षांच्या पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या ग्रेटा थनबर्ग हिनं आपल्या भाषणानं लोकांच्या भावूक तर केलंच पण विचार करायलाही भाग पाडलं.

पर्यावरण संरक्षणासाठी (Environment conservation) सध्या जगभर अनेक आंदोलनं उभी राहत आहेत. अशाच एका आंदोलनात ग्रेटाही सहभागी झालीय. ग्रेटाच्या या भाषणानं संयुक्त राष्ट्र महासचिव एन्टोनियो गुटेरस यांच्यासहीत जगभरातील अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसला.

आपल्या भाषणात 'तुम्ही आमची स्वप्न, आमचं बालपण आपल्या अर्थहिन शब्दांनी हिरावून घेतलंत. तुमची हिंमतच कशी झाली? परंतु, मी अजूनही भाग्यवान आहे. पण इतर लोक अजूनही हे सहन करत आहेत, मरणासन्न अवस्थेत आहे. संपूर्ण इको सिस्टम नष्ट होतंय' असं ग्रेटा हिनं जगभरातील अनेक नेत्यांना उद्देशून म्हटलं.

या दरम्यान ग्रेटाही भावूक झाली. 'तुम्ही आम्हाला अयशस्वी केलं. तरुणांना वाटतंय तुम्ही आमचा छळ केलात. आम्हा तरुणांचे डोळे तुमच्याकडे लागलेत. जर तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा अयशस्वी केलं तर आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही' असं म्हणताना ग्रेटाला आपले अश्रू आवरणंही कठिण झालं होतं.

आपण सामूहिकरित्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहोत आणि तुम्ही पैसे आणि आर्थिक विकासाच्या काल्पनिक कथांच्या गप्पा मारता. तुम्हाला ही हिंमत होतेच कशी? पण आता मात्र जगाला जाग आलीय. तुम्हाला याक्षणी सीमारेषा आखायलाच हवी, असंही ग्रेटानं आपल्या भाषणात म्हटलं.