मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये Corona साथीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. रशियामध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. युरोपातील इतर देशांमध्येही साथीच्या रोगाचा संसर्ग वाढण्याचा धोका कायम आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोना बाधितांची संख्या 25.59 दशलक्ष वर पोहोचली असून या महामारीमुळे 51.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर लसीकरणाचा आकडाही 7.59 अब्ज वर केला आहे. जगातील सर्वाधिक 47,528,607 प्रकरणे आणि 768,658 मृत्यूंसह अमेरिका हा सर्वात जास्त प्रभावित देश आहे.
ऑस्ट्रियात देशव्यापी लॉकडाऊन
कोरोनाच्या चौथ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रियामध्ये देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. ऑस्ट्रियाचे चांसलर अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी शुक्रवारी सांगितले की, लॉकडाउन सोमवारपासून सुरू होईल आणि दहा दिवसांसाठी लागू असेल. यामध्ये विद्यार्थ्यांचे थेट वर्ग शाळांमध्ये होणार नाहीत. एवढेच नाही तर रेस्टॉरंट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात येणार आहे. देशात 1 फेब्रुवारीपासून लसीकरणही अनिवार्य करण्यात येणार आहे. चान्सलर अलेक्झांडर शॅलेनबर्ग म्हणाले की, आम्हाला पाचवी लाट नको आहे. (Lockdown in Austria)
रशियामध्ये 1,254 ठार
रशियन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी साथीच्या रोगामुळे मृत्यूची नोंद केली. रशियाच्या राज्य कोविड टास्क फोर्सने सांगितले की, गेल्या 24 तासांत महामारीमुळे 1,254 लोकांचा मृत्यू झाला, तर गुरुवारी 1,251 आणि बुधवारी 1,247 लोकांचा मृत्यू झाला. रशियामध्ये गेल्या 24 तासांत 37156 नवीन रुग्ण आढळले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लसीकरणाचे कमी दर आणि कोरोना संसर्गाबाबत लोकांच्या उदासीन वृत्तीमुळे संसर्गाची प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये नवीन वाढ झाली आहे.
ब्राझीलमध्ये 293, जर्मनीमध्ये 201 ठार
ब्राझीलमध्ये एका दिवसात 293 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून, साथीच्या आजारामुळे मृतांची संख्या 612,144 वर पोहोचली आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात कोरोना संसर्गाची 12,301 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे संक्रमितांची संख्या 21,989,962 झाली आहे.
जर्मनीमध्येही संसर्ग झपाट्याने पसरत आहे. जर्मनीमध्ये गेल्या 24 तासांत कोविडचे 52,970 रुग्ण आढळून आले असून, बाधित लोकांची संख्या 5,248,291 वर पोहोचली आहे, तर एका दिवसात या महामारीमुळे 201 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या 98,739 वर पोहोचली आहे.