ऑकलंड : एका व्यक्तीसोबत असा प्रकार घडला आहे, ज्याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. हा व्यक्ती पोहण्यासाठी गेला होता तोपर्यंत त्याला काहीही होत नव्हतं, परंतु तो पोहून परतल्यानंतर मात्र त्याच्या कानात दुखू लागलं. सुरुवातीला त्याने याकडे दूर्लक्ष केलं, त्याला वाटलं की, हे सामान्य आहे. परंतु नंतर जेव्हा त्याचं दुखणं वाढलं तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी तपास केल्यावर डॉक्टरला ही धक्का बसला.
हे प्रकरण न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील आहे. येथे राहणाऱ्या झेन वेडिंग नावाची व्यक्ती जेव्हा पोहूण घरी आला तेव्हा थोडे विचित्र वाटले. त्याच्या कानात हलकेसे दुखत होते आणि हलकीशी हालचाल जाणवत होती. हळूहळू, ही हालचाल तीव्र वेदनांमध्ये बदलली आणि एका कानात ऐकायला येण जवळजवळ बंद झाले होते. त्रास वाढल्यानंतर अखेर त्याने डॉक्टरांना दाखवले.
डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी जेन वेडिंगला काही अँटीबायोटिक्स दिले आणि कान सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरण्याचा सल्ला दिला. पोहल्यामुळे त्या व्यक्तीच्या कानात पाणी भरले असावे, असे डॉक्टरांना वाटले.
मात्र, जेनच्या कानाचे दुखणे वाढल्यानंतर त्याने दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्या डॉक्टरांनी त्याच्या कानाची तपासणी केली. तेव्हा त्यांना जेनच्या कानात मृत झुरळ अडकल्याचे दिसले. यामुळेच त्याचा कान दुखत असल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले. ज्यानंतर या डॉक्टरांना जेनच्या कानातून झुरळ बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.
डॉक्टरांनी जेनच्या कानातून झुरळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील अर्धाच भाग बाहेर आला. उरलेला भाग यंत्राच्या साहाय्याने कसा तरी काढण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, झुरळ आणखी काही दिवस आत राहिले असते, तर जेनलाही ट्यूमर झाला असता.
न्यूझीलंड हेराल्डच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी याआधी अशी केस पाहिली नव्हती, तर जेन या दुखण्याने प्रचंड घाबरला आहे. सध्या तो ठीक आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो पुढील उपचार करत घेत आहे.