फरार Mehul Choksi च्या गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा, चोकसीने केलाय अपहरणाचा आरोप

मेहुल चोकसीने गर्लफ्रेंडवर केलाय अपहरणाचा आरोप...

Updated: Jun 8, 2021, 07:11 PM IST
फरार Mehul Choksi च्या गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा, चोकसीने केलाय अपहरणाचा आरोप title=

नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी (Mehul Choksi) प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. 'मिस्ट्री गर्ल' बारबरा जराबिका (Barbara Jarabica) ची चर्चा असताना WION या वृत्तवाहिनीने तिला शोधून काढले. WION सोबत बोलताना तिने दावा केला आहे की, ज्या दिवशी मेहुल चोकसी गायब झालेला त्या दिवशी ती एंटीगुआमध्ये नव्हती.

मेहुल चोकसी (Mehul Choksi) याची कथित गर्लफ्रेंड बारबरा जराबिका (Barbara Jarabica) ने चोकसी सोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना म्हटलं की, 'तो (चोकसी) मला पसंद करत होता. चोकसीने त्याचं नाव राज असल्याचं सांगितलं. तिला चोकसीबद्दल काही माहित नव्हतं. त्याने एक हिरा मला भेट दिला होता. जो बनावट होता. त्याने अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या.'

बारबरा जराबिकाने म्हटलं की, तिची आणि चोकसी यांची पहिली भेट मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती. तिने अपहरणाची गोष्ट देखील नाकारली. दिवसा अपहरणाचा प्रश्नच येत नाही. ती प्रॉपर्टी कंसल्टंट म्हणून काम करत होती. गेल्या 2 वर्षापासून ती एंटीगुआमध्ये आहे. या दरम्यान तिची भेट चोकसी सोबत झाली. जेव्हा भेट झाली तेव्हा त्याचा अनेक स्टाफ त्याला राजच बोलत होते.

मेहुल चोकसी (Mehul Choksi) ने एंटीगुआ पोलीस कमिश्नरांना पत्र लिहून बारबरा जराबिकासह 5 लोकांवर त्याचं अपहरण करुन त्याला डोमिनिका (Dominica) आणल्याचा आरोप केला आहे. पत्रात मेहुल चोकसीने म्हटलंय की, 'तो बारबराला आधी पासून ओळखतो. कारण ती त्याच्या घराजवळ राहत होती. संध्याकाळी फेरफटका मारताना तिची भेट व्हायची.'

चोकसी (Mehul Choksi) ने आरोप केला आहे की, 23 मे रोजी बारबराने त्याला घरी बोलवलं. तो घरी पोहोचला तेव्हा ती वाईन घेत होती. त्यानंतर काही वेळेत 8 ते 10 लोकं आले आणि त्याला तिच्या घरातून उचलून घेऊन गेलेत. त्यांनी ते एंटीगुआ पोलीस असल्याचं सांगितलं. त्यांनी त्याला सेंट जॉन पोलीस स्टेशनला घेऊन जात असल्याचं सांगितलं.

मेहुल चोकसीने आरोप केलाय की, त्यांना माझी सर्व माहिती होती. ते माझ्यावर नजर ठेवून होते. मी जेव्हा माझ्या वकिलासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी यासाठी नकार दिला. ते मला मारहाण करत होते. त्यांनी माझं घड्याळ, मोबाईल, फोन सगळं काही हिसकावून घेतलं.'