तिला आई व्हायचं होतं, म्हणून 'स्पर्म डोनर'सोबत संबंध ठेवले, मुलं झाल्यावर मात्र....

बाळासाठी स्पर्म डोनरसोबत १० वेळा ठेवले संबंध आणि आता 

Updated: Jan 21, 2022, 06:45 AM IST
तिला आई व्हायचं होतं, म्हणून 'स्पर्म डोनर'सोबत संबंध ठेवले, मुलं झाल्यावर मात्र....  title=

मुंबई : स्पर्म डोनरच्या मदतीने आई बनलेल्या महिलेला यापुढे मुलालासोबत ठेवायचे नाही. ती महिला तिच्या मुलाला दत्तक देण्याता प्रयत्न करत आहे. जपानमध्ये राहणाऱ्या या महिलेचे म्हणणे आहे की, डोनरने त्याची खरी ओळख लपवून ठेवल्याने तिला आता हे मूल नको आहे. वास्तविक, शुक्राणू दान(Sperm Donar) करणाऱ्या व्यक्तीने स्वत: जपानी आणि अविवाहित असल्याचे सांगितले होते, परंतु आता महिलेला त्याचे संपूर्ण सत्य समोर आले आहे.

ऑनलाइन शोधला होता Donar

'इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, 30 वर्षीय महिलेचे आधीच लग्न झाले आहे आणि तिला एक मूल आहे. परंतु तिला तिचे कुटुंब वाढवायचे होते आणि तिला तिच्या पतीकडून मूल नको होते कारण ती काही आनुवंशिक आजाराने ग्रस्त आहे.

म्हणूनच ती महिला ऑनलाइन डोनर शोधत होती. जुलै 2019 मध्ये तिचा शोध पूर्ण झाला. स्पर्म दान करणाऱ्या चिनी व्यक्तीने महिलेला सांगितले की तो जपानचा आहे आणि त्याचे अजून लग्न झालेले नाही.

१० वेळा संबंध देखील ठेवले 

जपानमधील विषमलिंगी (Heterosexual Married Couples) विवाहित जोडप्यांसाठी कृत्रिम गर्भाधान  (Artificial Insemination)  प्रतिबंधित असल्याने, महिलेने गर्भवती होण्याच्या आशेने 10 वेळा स्पर्म डोनरशी लैंगिक संबंध ठेवले.

सर्व काही महिलेच्या म्हणण्यानुसार घडले आणि ती गर्भवती झाली. तिने एका मुलालाही जन्म दिला. पण आता तिला स्पर्म डोनरची सत्यता कळून आल्याने ती मुलाला आपल्याजवळ ठेवू इच्छित नाही.

करोडो रुपयांची भरपाई 

या महिलेने मूल दत्तक देण्यासाठी टोकियोमधील एका एजन्सीशी संपर्क साधला आहे. यासोबतच स्पर्म डोनरवर कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. भावनांशी खेळत असल्याचे कारण देत महिलेने स्पर्म डोनरकडून £2.1 दशलक्ष (21 कोटी रुपये) भरपाईची मागणीही केली आहे.

तिच्या वकिलाने पत्रकार परिषदेत सांगितले की, स्पर्म डोनरचे सत्य समजल्यानंतर महिलेला धक्का बसला आहे आणि तिला नीट झोप येत नाही.