'हा' रहस्यमय फोटो देतोय विचित्र अनुभव, तुम्हाला 'हा' फोटो पाहून काय वाटतंय पाहा

खरंतर पांढऱ्या बॅग्राउंडवर काळ्या रंगाचे ठिपके आहेत आणि हे ठिपके मध्यभागी आल्यावर एकमेकांमध्ये मिसळून एक काळा गोळा तयार करत आहे.

Updated: Jun 4, 2022, 03:44 PM IST
'हा' रहस्यमय फोटो देतोय विचित्र अनुभव, तुम्हाला 'हा' फोटो पाहून काय वाटतंय पाहा title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन संदर्भात फोटो किंवा व्हिडीओ ट्रेंडिंगवरती आहेत. खरंतर हे फोटो आपल्या सर्वांच्याच मेंदूला विचार करायला लावणारे असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला एका काळ्या बोगद्यात पडल्यासारखे वाटते. खरंतर हा एक भ्रम आहे. परंतु आपण एक टक त्याच्याकडे पाहात राहिलो तर खरंच आपल्याला तसा भास होतो.

खरंतर पांढऱ्या बॅग्राउंडवर काळ्या रंगाचे ठिपके आहेत आणि हे ठिपके मध्यभागी आल्यावर एकमेकांमध्ये मिसळून एक काळा गोळा तयार करत आहे.

खरंतर हा काळा गोळा अशाप्रकारे तयार झाला आहे आणि त्यात या बॅग्राउंडची जोड, ज्यामुळे हा फोटो आपल्या डोळ्यांना भ्रमात टाकत आहे. याच कारणामुळे आपल्याला या अंधाऱ्या गोळ्यात पडण्यासारखा अनुभव घेता येतो.

जपानी मानसशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक अकियोशी किटाओका यांनी हा भ्रम निर्माण केला आहे. संशोधकांनी एक संशोधन करताना लिहिले आहे की, हे पाहिल्यानंतर लोकांना त्या काळ्या अंधाराच्या आता खेचल्याचे भावना येऊ लागली आहे. आपण कुठल्यातरी अंधाऱ्या जागी प्रवेश करत आहोत असे त्यांना वाटते.

हा फोटो पाहणाऱ्या 10 पैकी 8 लोकांनी असे सांगितले आहे की, त्यांना काही सेकंद काहीही दिलसे नाही आणि नंतर अंधाऱ्या गुहेत पडल्यासारखा त्यांना भास झाला.

संशोधकांनी 18 ते 41 वर्षे वयोगटातील आणि परिपूर्ण दृष्टी असलेल्या 50 लोकांची निवड केली. जेव्हा त्यांना हा फोटो दाखवला गेला. त्यांनी वेगवेगळ्या रंगात आणि आकारात देखील हा फोटो दाखवले. परंतु ज्या लोकांनी काळ्या रंगात फोटो पाहिला, त्यांना यामध्ये पडल्यासारखे वाटले.

तुम्हाला देखील असाच अनुभव आला असेल, तर आम्हाला ते कळवा आणि तुमच्या मित्रांना हा फोटो शेअर करा.