स्पेसएक्स ड्रॅगनची यशस्वी लँडिग, समुद्रात उतरले अंतराळवीर

45 वर्षांत प्रथमच नासाने अंतराळवीरांना समुद्रात उतरवले आहे.

Updated: Aug 3, 2020, 10:05 AM IST
स्पेसएक्स ड्रॅगनची यशस्वी लँडिग, समुद्रात उतरले अंतराळवीर title=

मुंबई : यूएस स्पेस एजन्सी नासाचे दोन अंतराळवीर खासगी कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन नावाच्या कॅप्सूलमध्ये बसून अवकाशातून समुद्रात उतरले आहेत. 45 वर्षांत प्रथमच नासाने अंतराळवीरांना समुद्रात उतरवले आहे.

स्पेसएक्सने आपल्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. व्हिडिओमध्ये, नासाच्या दोन अंतराळवीरांना स्प्लॅशडाऊन होतांना पाहिले जावू शकते. स्प्लॅशडाऊन म्हणजे पॅराशूटने अवकाशयान सोडून धरतीवर येण्याची पद्धत. अंतराळवीर बॉब बेहंकेन आणि डाउ हर्ले हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूल घेऊन आले.

अंतराळवीरांनी सुमारे दोन महिने अंतराळात अभ्यास घेतल्यानंतर मेक्सिकोच्या खाडीमध्ये उतरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परत आल्यावर अंतराळवीरांचे आभार मानले. एका ट्विटमध्ये अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, दोन महिन्यांच्या यशस्वी मिशननंतर नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर परत आले आहेत. सर्वांचे आभार! '

31 मे रोजी, खाजगी कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन स्पेसक्राफ्टने दोन अंतराळवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन यशस्वीरित्या उड्डाण केले. अंतराळवीर बॉब बेहनकेन आणि डउ हर्ले यांनी ही अंतराळ मोहिम पूर्ण केली.

नासाची स्पेसएक्स डेमो -2 म्हणून ओळखले जाणारे हे अभियान स्पेसएक्सच्या क्रू-कॅरींग सिस्टमची पडताळणी करण्याच्या उद्देशाने एंड-टू-एंड फ्लाइट आहे. ज्यात लॉन्च, इन-ऑर्बिट, डॉकिंग आणि लँडिंग ऑपरेशन्सचा समावेश आहे.