मुंबई : कामाला जाणार प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या विकेंडची प्रतिक्षा करत असतो. गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या लेबर कोडची जोरदार तयारी सुरु आहे. नव्या लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम करावं लागेल (4 days work week) आणि 3 दिवस त्यांना सुट्टी मिळणार. ही संकल्पनेला अजून राज्यांत परवानगी मिळालेली नाही. नवीन वेतन संहितेनुसार, पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टीचा पर्याय आहे. आठवड्यातून तीन दिवस सुट्टीचा पर्याय घेणार्या लोकांना दररोज ऑफिसमध्ये 12 तास काम करावे लागेल, याचा अर्थ असा आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आठवड्यातून 48 तास काम करावे लागेल.
भारतात या नव्या लेबर कोडची तयारी सुरु असली तरी ब्रिटनमध्ये (Britain) याची चाचणी सुरु करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये अनेक कंपन्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 4 दिवस 12 तास कामाची पद्धत सुरु करण्यात आली. काही कंपन्यांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबवली जात असून यातले तीन महिने पूर्ण झाले आहेत. पहिल्या तीन महिन्यातले काही निष्कर्ष समोर आले आहेत. ब्रिटनमधल्या लिटरल ह्यूमन्स या कंपनीत न्यू लेबर कोड (News Labour Code) पद्धत राबवली जात असून कंपनीचे सह संस्थापक गॅडसबी पीट यांनी या पद्धतीबद्दल फायदे तोटे सांगितले आहेत. पीट यांनी केलेल्या दाव्यानुसार याचे तोटे कमी आणि फायदे जास्त आहेत. या धोरणांतर्गत उत्पादकता 5 टक्क्यांनी वाढली आहे, तसंच कर्मचाऱ्यांच्या आनंदात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ जर कर्मचारी आनंदी असतील तर ते खूप चांगलं काम करतात. कंपनीला चांगलं टॅलेंट मिळालं असल्याचं पीट यांनी म्हटलंय.
याविषयी बोलताना पीट पुढे म्हणाले, '4 दिवस कामा करायचं या नव्या लेबर कोडची चाचणी करत असताना कंपनीला सुरुवातीला मोठा त्रास सहन करावा लागला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना 12 तास काम करण्याचा विचार केल्यामुळे त्यांना थोडा तणाव सहन करावा लागत होता. पण कालांतरानं त्यांना सवय झाली आणि तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर परतलेले कर्मचारी आनंदी होते आणि त्यांनी जोमानं काम केलं. कर्मचाऱ्यांना ही पद्धत आवडली असून पाच किंवा सहा दिवसांच्या वर्किंग डेच्या पद्धतीसाठी ते आता तयार नाहीत. (new labour code companies start trial of 4 working days know result what employee think)
ब्रिटनमध्ये न्यू लेबर कोडवर एक सर्व्हे करण्यात आला. यावेळी 63 टक्के कंपन्यांनी या धोरणेच्या बाजूने मत दिलं आहे. कारण या कामाच्या संकल्पनेतून चांगलं टॅलेंट मिळत आहे, असा कंपन्यांचा दावा आहे. तर जवळपास 78 टक्के कर्मचाऱ्यांनीही या धोरणेला पसंती दर्शवली आहे. या धोरणेमुळे तणाव कमी होत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कर्मचारी पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आहे आणि अधिक सकारात्मक उर्जेनं कार्यालयीन काम करत आहेत. ब्रिटननंतर कॅनडा आणि अमेरिकेशिवाय युरोपातील अनेक देशांमध्ये ही संकल्पना चाचणी म्हणून राबवली जात आहे. भारतातही लवकरच हे धोरण लागू होण्याची प्रतीक्षा अनेक कर्मचारी करत आहेत.