कसं सुचतं? लग्न झालं पण गिफ्टसाठी गाडीच्या काचेवर केलं आवाहन, कपलची भन्नाट आयडिया

Couple Asks For Gift Via Venmo Viral Wedding Post​: हल्ली नाना तऱ्हेचे व्हिडीओ आणि फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची एकच चर्चा रंगताना दिसते. त्यात आता अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 15, 2023, 08:03 PM IST
कसं सुचतं? लग्न झालं पण गिफ्टसाठी गाडीच्या काचेवर केलं आवाहन, कपलची भन्नाट आयडिया title=
June 15, 2023 | newlywed couple shares their details on car window and asks strangers to gift them money (Photo: @weddingshaming)

Viral Wedding Post: सध्या जगभरात सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे इंटरनेटवर नाना तऱ्हेचे व्हिडीओ आणि फोटोज हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नवं नवं लग्न झालेल्याचे हटके व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होताना आपण पाहतो. कधी त्यांच्या लग्नातील लाईव्ह डान्स व्हिडीओ हे व्हायरल होतात तर कधी त्यांच्या लग्नात घडलेले अतरंगी प्रसंग सोशल मीडियावर तूफान गाजताना दिसतात. त्यामुळे नेटकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात मनोरंजन होताना दिसते. असे व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नवरा नवरीला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते सध्या असाच एका फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यात नव्या नवरा नवरीनं चक्क आपल्या लग्नाचे गिफ्ट लोकांकडूनच मागण्याचा प्रयास केला आहे. 

आपण लग्नाच्यावेळी आपल्या लग्नपत्रिकेत एकतर आहेर आणू नका असं तरी लिहितो अन्यथा काहीच लिहित नाही. परंतु या एका कपलनं मात्र आपलं लग्न झाल्या झाल्या एक हटके मेसेज आपल्या गाडीच्या मागे लिहिला आहे तो पाहून नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, एका निळ्या गाडीच्या मागे 'जस्ट मॅरिड' असं लिहिलं आहे आणि आपले पमेंट डिटेल्स लिहिले आहे.

हेही वाचा - कोणी म्हणालं नवीन पॅंट शिवून घे तर कोणी नवी चप्पल घे! हेमांगी कवी ट्रोल; पाहा VIDEO

आपल्याला ब्राईडला एक ड्रींक गिफ्ट करा असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं दिसते आहे. त्यामुळे ही पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे. परंतु हा नक्की प्रकार आहे तरी काय? त्यातून अशा प्रकारे कोणी आपल्याच लग्नाचे गिफ्ट असं सार्वजनिक प्रकारे का मागतंय असा प्रश्न हा तुम्हालाही पडला असेलच. त्यातून गाडीच्या मागे असं लिहिण्याचा हेतू तरी काय असाही प्रश्न अनेकांना पडला असेलच तेव्हा जाणून घेऊया की नक्की हा प्रकार आहे तरी काय? 

This is as tacky as it gets.... Not even a "buy the bride a drink" just $$$ pls
by u/skyon_high in weddingshaming

ही पोस्ट @weddingshaming नावाच्या युझरनं रेडिटवर शेअर केली आहे. आतापर्यंत या पोस्टला हजारो लाईक्स आले आहेत. त्यासोबत या पोस्टखाली लोकांनी नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे या पोस्टची सगळीकेडच चर्चा रंगली आहे. 'हे खरंच होतं का', 'चांगली आयडिया आहे'. 'लोकांनीही असं करून पाहायला हवं' अशा नाना तऱ्हेच्या कमेंट्सही केल्या आहेत. त्यामुळे ही पोस्ट चर्चेत आली आहे. लोकांनी यावर नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. सध्या अशाप्रकारच्या पोस्ट या चांगल्याच व्हायल होताना दिसतात. त्यामुळे यांची चर्चा चांगलीच रंगते. या पोस्टचीही तशीच चर्चा रंगली आहे.