Nostradamus Prediction : 3 दिवस सूर्य दिसणार नाही..., नास्त्रेदमस यांची भयंकर भविष्यवाणी

रोबोट मानवावर नियंत्रण ठेवतील आणि ते हळूहळू संपूर्ण मानव जातीसाठी धोक्याचे बनू शकतात

Updated: Sep 18, 2022, 10:16 PM IST
Nostradamus Prediction : 3 दिवस सूर्य दिसणार नाही..., नास्त्रेदमस यांची भयंकर भविष्यवाणी title=

Nostradamus Prediction: जगभरात अनेक भविष्यवेत्ते होऊन गेलेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जिभेवरची नावं म्हणजे बाबा वेंगा किंवा नास्त्रेदमस. या दोन्ही भविष्यवेत्त्यांनी त्यांच्या मृत्यूआधीच अनेक भाकीत लिहून ठेवले आहेत. मृत्यूआधी 1566 मध्ये नास्त्रेदमस यांनी तब्बल  6,338 भविष्यवाण्या लिहून ठेवल्या होत्या. यामध्ये जगाचा अंत कसा आणि कधी होणार हे ददेखील सांगितलं आहे. नास्त्रेदमस यांची क्वीन एलिझाबेथ यांच्याबाबतही भविष्यवाणी नुकतीच खरी ठरल्याचं बोललं जातं. 

नॉस्‍त्रेदमस यांनी 2022 म्हणजेच चालू वर्षाबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. या भविष्यवाणीत या दरम्यानच्या काळात पृथ्वीवर 3 दिवस अंधार पसरणार असल्याचं म्हंटलं आहे.  

72 तास केवळ अंधार : 

समोर आलेल्या माहितीच्या आधारे नॉस्‍त्रेदमस यांनी वर्ष 2022 बाबत अनेक भविष्यवाण्या केलेल्या समोर येतात. वर्ष 2022 हे सुरुवातीला विनाशाचं आणि त्यानंतर शांती बहाल करणारं असेल. मात्र या शांतीआधी संपूर्ण जगात तब्बल तीन दिवस म्हणजेच 72 तास अंधार पसरणार असल्याचं नॉस्‍त्रेदमस यांनी लिहून ठेवलं आहे. या काळात बर्फवृष्टी आणि अनेक देशांमधील युद्ध सुरु होताच संपतील असं देखील लिहून ठेवण्यात आलेलं आहे. या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीने घडतील असंही त्यांनी म्हंटलं आहे. 

अण्वस्त्र हल्ला होणार

नॉस्‍त्रेदमस यांनी 2022 मध्ये भयंकर आण्विक स्फोट होऊ शकतो अशीही भविष्यवाणी केली होती. या महाभयंकर स्फोटाने जलवायू परिवर्तन होऊन पृथ्वीवरील तापमान वाढेल. याने पृथ्वीवरील हवामानात बदल होईल असंही नॉस्‍त्रेदमस यांनी भाकीत केलं आहे. 

मानवाला संपवतील रोबोट्स 

2022 मध्ये जगावर रोबोट्सचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढेल असेही नॉस्‍त्रेदमस यांनी म्हंटलं आहे. रोबोट मानवावर नियंत्रण ठेवतील आणि ते हळूहळू संपूर्ण मानव जातीसाठी धोक्याचे बनू शकतात असं भाकीत करण्यात आलेलं आहे.