Optical Illusions : आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान, या फोटोतील फेब्रुवारीची अचूक स्पेलिंग शोधा

ऑप्टीकल इल्यूजन हे एक असं आव्हान आहे, ज्यामुळे बुद्धीला चालना मिळते, पण आज आम्ही तुम्हाला एक असं आव्हान देणार आहोत, जे ऑप्टिकल इल्यूजनमधलं आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान आहे

Updated: Feb 24, 2023, 02:16 PM IST
Optical Illusions : आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान, या फोटोतील फेब्रुवारीची अचूक स्पेलिंग शोधा title=

Greatest Challenge Till Date: ऑप्टिकल इल्यूजन (optical illusions) एक असा खेळ आहे ज्यामुळे आपल्या बुद्धिला चालना मिळते. आजपर्यंत आपण ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो पाहिले आहेत, ज्यात आपल्याला वेगवेगळ्या वस्तू किंवा व्यक्ती शोधण्याचं आव्हान दिलं जातं. यात आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागतो. पण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत ऑप्टिकल इल्यूजनमधलं आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान देणार आहोत. यासाठी एक असा फोटो देण्यात आला आहे, ज्यात तुम्हाला फेब्रुवारी (February) महिन्याची अचूक स्पेलिंग शोधायची आहे. 

फेब्रुवारीची अचूक स्पेलिंग शोधा
वरील फोटोत फेब्रुवारीच्या स्पेलिंग (Spelling) देण्यात आल्या आहेत. पण त्या सर्व चुकीच्या आहेत. तुम्हाला त्यातून अचूनक स्पेलिंग शोधायची आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (Social Media) हा फोटो व्हायरल झाला आहे. यात युजर्सना हे कठिण आव्हान देण्यात आलं आहे. यात फेब्रुवारीच्या अनेक स्पेलिंग देण्यात आल्या आहेत. यात अचूक स्पेलिंग शोधण्याचं हे आव्हान आहे. तुम्ही जिनिअस असाल तर काही सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करुन शकता. 

150 फेब्रुवारीच्या स्पेलिंग
व्हायरल होणाऱ्या या फोटोत एका पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात फेब्रुवारीच्या स्पेलिंग लिहिण्यात आल्या आहेत. साधारण दीडशेच्या आसपास या स्पेलिंग आहेत. पण मजेची गोष्ट म्हणजे एक सोडून बाकी सर्व स्पेलिंग चुकीच्या आहेत. नेमकी अचूक स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे आणि तेही काही सेकंदात. ऑप्टिकल इल्यूजन आव्हानं खूप असतात पण सरं आव्हान असतं ते किती वेगात आपण अचूक गोष्ट शोधतो याचं. 

जाणून घ्या उत्तर
ऑप्टिकल इल्यूजनचं आव्हान खूप कठिण आहे. तुम्ही उत्तर शोधलंच असेल, पण जर तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला उत्तर मिळवून देण्यासाठी मदत करतो.  उजव्या बाजूने दुसऱ्या ओळीत अकरावी स्पेलिंग ही फेब्रुवारीची अचूक स्पेलिंग आहे. पण इतर स्पेलिंगमध्ये अचूक स्पेलिंग ओळखण्याचा कस लागतो. आता तुम्ही किती वेळात ही अचूक स्पेलिंग शोधली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.