लंडन : ब्रिटनमध्ये 2040 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारवर बंदी लागणार आहे. रिपोर्टनुसार वायु प्रदूषण रोखण्यासाठी ब्रिटेनमध्ये 2040 नंतर फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्या विकल्या जातील. याआधी फ्रांसने देखील अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.
फ्रांसचे पर्यावरण मंत्री निकोलस उलो यांनी जीवाश्म ईंधनावर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याची घोषणेला पॅरिस पर्यावरण कराराच्या प्रती फ्रांसची असलेली प्रतिबद्धता असल्याचं म्हटलं आहे.
या योजनेनुसार पेट्रोल किंवा डिझेल या इंजनासोबत इलेक्ट्रिक मोटरच्या नव्या हायब्रिड वाहनांच्या विक्रीवर देखील बंदी घातली जाणार आहे.