Playing Cards Facts: चला काहीतरी Timepass करु असं म्हटल्यानंतर दोस्तांच्या मैफिलीत किंवा मग कौटुंबीक स्नेहसंमेलनामध्ये अनेकांचची पसंती असते ती म्हणजे पत्ते खेळण्याला. करमणुकीचं साधन म्हणून बरेचजण पत्ते खेळतात. यामध्ये पैसे वगैरे लावण्याचा काहीच हेतू नसतो. पण, कोणा एका दिवशी या खेळाला पसंती मात्र मिळते हे नाकारता येणार नाही. अनेकांचाच आवडीचा बैठा खेळ म्हणजे, पत्ते. 52 पानांच्या या खेळात बऱेच प्रकारही आहेत. बरं, प्रत्येक पत्त्याचं महत्त्वंही तितकंच वेगळं. पण, त्यातही एक्का म्हणजे सगळ्यात अव्वल.
राजा- राणीपेक्षाही या एक्क्याला इतकं महत्त्वं का बुवा? प्रश्न पडलाय कधी? यामागे एक अत्यंक रंजक कारण आहे. त्यासाठी फार जुन्या काळात डोकावायला लागणार आहे. कारण, याचं नातं थेट 1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीशी आहे.
एक्का मोठं पान का?
पत्त्यांविषयी अभ्यास असणारे इतिहासकार सॅम्युअल सिंगर यांच्यामते प्लेइंग कार्ड्स किंवा पत्त्यांमध्ये तत्कालीन सामाजिक स्थितीचं प्रतिबिंब दिसतं. यामध्ये चार प्रकारचे पत्ते असतात. यामध्ये हुकूम, बदाम, इस्पिक, चौकट. हुकूम हे राजेशाहीचं प्रतीक मानलं जातं.
असं म्हणतात की, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (France) राजेशाही कायमची नाहीशी झाली. यामुळं एक्का (A) टॉप कार्ड ठरला. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मजुरांनी कशा प्रकारे राजेशाहीचा नायनाट केला हे यावरून सिद्ध झालं. खेळण्याच्या पत्त्यांमध्ये एक्का सर्वसामान्यांचं प्रतीक असतो. त्याकडे क्रांतीकाऱ्यांचं प्रतीक म्हणूनही पाहिलं जातं. म्हणूनच तो राजा- राणीपेक्षा श्रेष्ठ असतो.
फ्रेंच राज्यक्रांती (French Revolution) थोडक्यात...
1789 ते 1799 पर्यंत फ्रान्समध्ये राजकीय आणि सामाजिक संरचनांमध्ये बदल झाले. यानंतर नेपोलियन बोनापार्ट यानं फ्रेंच साम्राज्याचा विस्तार केला. यादरम्यान ही क्रांती आणखी पुढे गेली. याचे परिणाम असे झाले, की राजाला सिंहासन सोडावं लागलं आणि प्रजात्ताक स्थापन झालं. पण, रक्तरंजित संघर्ष काही थांबला नाही. अखेर बोनापार्टही हुकूमशाही सिद्ध झाली. फ्रेंच राज्यक्रांतीचा जागतिक इतिहासावर मोठा परिणाम दिसून येतो.