क्रूरकृत्य : बाळाचा पहिला गळा चिरला, त्यानंतर हात कापला आणि ...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना 

Updated: Jul 20, 2021, 08:21 AM IST
क्रूरकृत्य : बाळाचा पहिला गळा चिरला, त्यानंतर हात कापला आणि ...

मुंबई : गुन्हा, क्राईम हा इतका भयानक असू शकतो की, त्याने तुमचं मन आणि मेंदू दोन्ही सुन्न होऊ शकतात. ही घटना अतिशय धक्कादायक आहेत. एका 13 वर्षीय मुलाची हत्या केली. त्यानंतर त्या मुलाचं धड शरीरापासून वेगळं करण्यात आलं. त्यानंतर जे केलं ते अतिशय धक्कादायक आहे. (Police shoot man suspected of beheading boy 13 and eating part of his head ) 

या बाळाची हत्या करून त्याच्या डोक्याचा काही भाग खावून त्याला फेकून देण्यात आलं. हा विभत्स हत्याकांड करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांसाठी देखील सर्वात मोठा धक्का 

मिररमध्ये छापून आलेल्या या बातमीनुसार, पोलिसांनी रविवारी दक्षिण फ्रान्सच्या टारस्कॉन (Tarascon) मध्ये असलेल्या अपार्टमेंटमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला की, पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. पोलिसांनी जेव्हा संपूर्ण घराची तपासणी केली तेव्हा मृतक बाळाचं डोकं एका बादलीमध्ये सापडलं. डोक्याचा काही भाग चावल्यासारखा होता. 

घरात कुणीच नव्हतं 

पोलिसांना एक मुलं हरवल्याची सूचना मिळाली होती. याचा तपास करतानाच ते टास्कॉन स्थित अपार्टमेंटमध्ये पोहोचले. तेथेच अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला. या अपार्टमेंटमध्ये 32 वर्षांचा युवक राहत होता. मात्र पोलीस तेथे पोहोचले तेव्हा तो नव्हता. त्यानंतर त्याचा तपास सुरू झाली. पोलिसांना हा आरोपी जवळच असल्याची माहिती मिळाली. 

आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पळून जात होता. त्यानंतर त्याच्यावर गोळी चालवण्यात आली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अद्याप पोलिसांना या मृत आरोपीची ओळख पटलेली नाही.