पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबरला करणार संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करू शकतात. उच्चस्तरीय बैठकीसाठी ग्लोबल बॉडीने जाहीर केलेल्या स्पीकर्सच्या तात्काळ यादीमध्ये ही माहिती समोर आली आहे.

Updated: Sep 2, 2020, 02:52 PM IST
पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबरला करणार संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करू शकतात. उच्चस्तरीय बैठकीसाठी ग्लोबल बॉडीने जाहीर केलेल्या स्पीकर्सच्या तात्काळ यादीमध्ये ही माहिती समोर आली आहे.

प्रथमच ऑनलाईन सत्र

संयुक्त राष्ट्राच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिवेशन ऑनलाईन होत असून जागतिक महामारीमुळे देशाचे प्रमुख बैठकीत थेट सहभागी होता येणार नाहीये. या सत्रासाठी आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडिओ चालवले जाणार आहेत.

मंगळवारी सत्रांविषयी माहिती

मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेंब्ली आणि कॉन्फरन्स मॅनेजमेंट विभागाने 75 व्या अधिवेशनाच्या सर्वसाधारण चर्चेसाठी वक्त्यांची यादी जाहीर केली. या यादीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी सर्वसाधारण चर्चेला मोदी संबोधित करू शकतात. पण पुढील दोन आठवड्यांमध्ये आणखी काही बदल होऊ शकतात. सर्वसाधारण चर्चा २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

ब्राझीलचे अध्यक्ष हे प्रथम संबोधित करतील
या यादीनुसार ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो हे पहिले वक्ते आहेत. सर्वसाधारण चर्चेच्या पहिल्या दिवशी अमेरिका हा दुसरा स्पीकर आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबोधित करतील.

सध्या यादीनुसार तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोआन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष हसन रूहानी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पहिल्या दिवसाच्या डिजिटल चर्चेला संबोधित करतील. अमेरिका संयुक्त राष्ट्राचा यजमान देश आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प वैयक्तिकरित्या उपस्थित राहून संबोधित करतील.