Queen Elizabeth IIs Funeral : ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II)यांच्यावर आज (19 सप्टेंबर 2022) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वाधिक काळ ब्रिटनच्या सिंहासनाची जबाबदारी घेणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला.राणीच्या निधनाची बातमी संपूर्ण जगभरात पसरली आणि प्रत्येत स्तरातून राजपद भूषवणाऱ्या या राणीला श्रद्धांजली देण्यात आली. राणीला अखेरचा निरोप देण्यासाठी जगभरातून
#WATCH | The State funeral service for Queen Elizabeth II begins at Westminster Abbey in London with the Royal family members and world leaders in attendance
(Source: Reuters) pic.twitter.com/agsllmfdHa
— ANI (@ANI) September 19, 2022
राणीला अखेरचा निरोप देण्यासाठी ब्रिटनमध्ये तोबा गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण जगभरातून या ठिकाणी प्रतिष्ठित आणि बड्या व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळाली.Queen Elizabeth II यांचं पार्थिव त्यांचे पती, ड्यूक ऑफ एडिनबर्ग(Duke of Edinburgh) यांच्यासोबत विंडसर कॅसल (Windsor Castle) मधील रॉयल वॉल्ट इथं पुरण्यात आलं. मागच्याच वर्षी एप्रिल महिन्यात प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांचं निधन झालं होतं.सर्वाधिक काळ राणीपद भूषवणाऱ्या एलिझाबेथ यांना निरोप देण्यासाठी आतापर्यंत जवळपास 8 लाख ब्रिटन आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावली. (Queen Elizabeth IIs Funeral Video nm)
The Cavalry Last Post is sounded by the State Trumpeters of the Household Cavalry before the Nation fell silent in Remembrance of Her Majesty The Queen. pic.twitter.com/ap5ccCiQW2
— The Royal Family (@RoyalFamily) September 19, 2022
राजेशाही परंपरेनुसार ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. शाही इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानंतर देशभरात 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आलं. दरम्यान भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये भारतातील लोकांच्या वतीने महाराणींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी ब्रिटनचे नवे राजे किंग चार्ल्स तिसरे (Charles III) यांची बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) भेट घेतली.
#WATCH | London: Queen Elizabeth II's coffin carried out of the Great West Door through Westminster Abbey; to be now placed back on to the State Gun Carriage ready for the procession from the abbey to Wellington Arch.
(Source: Reuters) pic.twitter.com/N900j7DRIk
— ANI (@ANI) September 19, 2022