Teen Accepted In 40+ Colleges: मुर्ती लहान पण किर्ती महान या म्हणीला साजेशी कामगिरी करणारी अनेक मुलांबद्दल आपण वाचलं आहे, ऐकलं. ही मुलं आपल्या वयाच्या मानाने फारच अव्वल कामगिरी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देतात. अशाच प्रकारची सर्वांना थक्क करणारी कामगिरी करणाऱ्या मुलाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याचं यश पाहून तुम्ही त्याचं तोंडभरुन कौतुक कराल पण त्याचं संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लहानवयातच या मुलाला हृदयासंदर्भातील समस्या असल्याने मुलाची वाढ सामान्य पद्धतीने होणार नाही असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. या सर्वावर मात करुन आज त्याने अभूतपूर्व यश मिळवलं आहे.
आता आपण ज्या मुलाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे रेजिस हॅरिस (Regis Harris). हॅरिस हा केवळ 17 वर्षांचा असून ते अमेरिकेत राहतो. कोलोरॅडोमध्ये राहणारा हॅरिस हा हायस्कूलचा विद्यार्थी होता. हॅरिसला तब्बल 1.6 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 13 कोटी रुपयांची स्कॉलरशिपही देण्यात आली आहे. हॅरिसने आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी त्याला तब्बल 40 हून अधिक कॉलेजेसने लेटर पाठवलं आहे. हॅरिसने आपल्या कॉलेजमध्येच यावं यासाठी अनेक नामवंत कॉलेजनेही त्याला प्रवेश देण्यासंदर्भात विचारणा केली आहे. सध्या हॅरिस हा जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
हॅरिसने 'अटलांटा न्यूज'ला त्याला आलेल्या ऑफर्ससंदर्भात विशेष मुलाखत दिली आहे. "मला एवढ्या कॉलेजकडून विचारणा झाली आहे की मीच थक्क झालो आहे. मी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची स्वप्नं पहायचो त्या कॉलेजनेही मला त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पत्रं पाठवली आहेत," असं हॅरिस म्हणाला. तसेच मला हे यश सहज मिळालेलं नाही. यामागे मी घेतलेली कठोर मेहनत आणि संघर्षाचा फार मोठा वाटा आहे, असंही हॅरिस म्हणाला. मी रात्रभर अभ्यास करायचो. रात्रभर मी केवळ वाचन करायचो, असंही हॅरिसने सांगितलं. अभ्यास करतानाच तो उदर्निवाह चालवण्यासाठी तो पार्ट टाइम नोकरीही करत होता. तसेच तो जवळच्या चर्चमध्ये रविवारी गाणं गाण्यासाठीही तो आवर्जून जायचा. तो अनेक ठिकाणी गाण्यासंदर्भातील कार्यक्रमांना जायचा. यामध्ये शाळेतील नॅश्नल ऑनर सोसायटी, चेक क्लब, वर्सिटी ट्रॅक टीम आणि शाळेतील बॅण्डमध्येही तो संगीताच्या आवडीपोटी तो सहाभगी झालेला. एवढं सारं करतानाही त्याने कधी अभ्यास सोडला नाही आणि त्याला अभूतपूर्व यश मिळालं.
हॅरिसने काम करता करता हायस्कूलमधील शेवटच्या परीक्षेत 4.0 जीपीए इतका स्कोअर केला आहे. त्याचं हे यश पाहून त्याच्या आई-वडिलांनाही फार आनंद झाला असून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याच्या आईने फेसबुकवर एक पोस्ट केली असून तो लहानपणापासूनच फार संघर्ष करत मोठा झाला आहे, असं म्हटलंय. त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागेल, त्याची वाढ नीट होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण माझ्या मुलाने या साऱ्यावर मात केली असं हॅरिसच्या आईने म्हटलं आहे.