30 कोटी पगार, काम फक्त स्वीच ऑन ऑफ करण्याचं तरीही कोणालाच नकोय ही नोकरी! कारण...

Rs 30 Crore Job Offer: ही नोकरी करणाऱ्याला 30 कोटींच्या पगाराबरोबरच अनेक आलिशान सुविधाही दिल्या जाणार आहेत. मात्र असं असतानाही कोणीच या नोकरीसाठी अर्ज करत नसून ही पोस्ट रिकामीच असल्याचं सांगितलं जात आहे. नेमका काय आहे हा जॉब पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 24, 2024, 03:10 PM IST
30 कोटी पगार, काम फक्त स्वीच ऑन ऑफ करण्याचं तरीही कोणालाच नकोय ही नोकरी! कारण... title=
हा जॉब घ्यायला कोणी तयार नाही

Rs 30 Crore Job Offer: जगभरातील अनेक जागांसंदर्भातील गूढ आजही कायम आहे. अशाच एका ठिकाणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत. हे ठिकाण आहे एक दिपस्तंभ! मात्र हा दिपस्तंभ साधासुधा नाही. सामान्यपणे जहाजांना मार्गदर्शन करण्याचं काम करणं हे दिपस्तंभाचं काम असतं. मात्र ज्या दिपस्तंभाबद्दल आपण बोलत आहोत तो स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुनाही आहे. ज्यांना साहसी आणि धाडस करायला आवडं त्यांच्यासाठी तर ही जागा स्वर्गाहून कमी नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे या दिपस्तंभात एक रात्रही राहणं कोणाला शक्य नाही असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी काम करण्यासाठी तब्बल 30 कोटींचा पगार आणि आलिशान लाइफस्टाइल ऑफर केली जाते. मात्र या ठिकाणी पोहणचं फारच कमी लोकांना शक्य आहे. एवढा पगार आणि सोयी असूनही हा जगातील सर्वात कठीण जॉब का मानला जातोय पाहूयात...

इतिहास काय?

प्रसिद्ध खलाशी कॅफ्टन मॉरिशिअसला एकदा इजिप्तमधील अॅलेक्सझॅण्ड्रीयाजवळ वादळाचा सामना करावाला लागला. या भागात फार मोठ्या आकाराचे दगड होते. त्यामुळे मॉरिशिअसच्या जहाजाला मोठं नुकसान झालं आणि अनेकांनी प्राण गमावले. त्यामुळेच या ठिकाणी दिपस्तंभ असणं गरजेचं असल्याचं अधोरेखित झालं. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी दिपस्तंभ हवा असं म्हणत तेथील सत्ताधाऱ्यांनी एका स्थापत्यकाराला बोलावलं. या भागात असलेल्या दगडांपासून जहाजांनी दूर रहावं म्हणून समुद्राच्या मध्यभागी दिपस्तंभ उभारण्याचं आव्हान या स्थापत्यकाराला देण्यात आलं. 

विशेष व्यवस्था

त्यानंतर इजिप्तमधील अॅलेक्झॅण्ड्रीया येथील फॅरोज बेटावर हा दिपस्तंभ उबारण्यात आला. याला 'द फॅरोज ऑफ अॅलेक्झॅण्ड्रीया' असंही म्हणतात. ही वास्तू स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. या दिपस्तंभामध्ये दूरुन प्रकाश दिसेल इतकी आग पेटवता येते. लेन्सच्या मदतीने आग दूरपर्यंत दिसेल अशी व्यवस्थाही इथे आहे.

आधी व्हायचा वापर आता...

दिपस्तंभ पूर्वीच्या काळी वापरले जायचे. जहाजांचे नुकसान होऊ नये, जहाजे भरकटून किंवा त्यांचा अपघात होऊन नुकसान होऊ नये या उद्देशाने दिपस्तंभ उभारले जायचे. पूर्वी दिपस्तंभ केवळ सागरी किनारा कुठे आहे हे समजण्यासाठी बांधले जायचे. मात्र नंतर ते समुद्रामध्ये उथळ भाग असेल अशा दगडांचं प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणीही बांधले जाऊ लागले. मात्र विजेचा शोध लागल्यापासून या दिपस्तंभांचा वापर करताना त्यामध्ये इलेक्ट्रीक दिव्यांच्या माध्यमातून प्रकाश दूरपर्यंत जाईल याची काळजी घेण्यात येऊ लागली. 

सात आश्चर्यांपैकी एक

'द फॅरोज ऑफ अॅलेक्झॅण्ड्रीया'चा दिपस्तंभ हा मानवाने उभारलेला सर्वात पहिल्या दिपस्तंभांपैकी एक आहे. हा दिपस्तंभ इसवी सनपूर्व 284 ते 246 दरम्यान उभारण्यात आला. या ठिकाणी पोहोचणं आजही फार आव्हानात्मक मानलं जातं. त्यामुळेच या दिपस्तंभाला पूर्वीच्या काळातील जगातील सात आश्चर्यांपैकी एक समजलं जायचं. 

पगार 30 कोटी

या ठिकाणी दिपस्तंभांची देभाल करणाऱ्या व्यक्तीने त्यामधील इलेक्ट्रीक दिवा सतत प्रकाशमान राहील याची खबरदारी घेणं अपेक्षित आहे. हा दिपस्तंभ फारच खडतर भागामध्ये असून तिथपर्यंत पोहोचणं फार आव्हानात्मक असल्याने ही नोकरी सर्वात कठीण नोकऱ्यांपैकी एक मानली जाते. या ठिकाणी दिपस्तंभाचा दिवा कायम सुरु राहील याची काळजी घेण्यासाठीचा पगार तब्बल 30 कोटी रुपये इतका आहे. 

नोकरीत काय अपेक्षित?

या नोकरीमध्ये देखभालीची जबाबदारी संभाळणाऱ्या व्यक्तीने या दुर्गम भागातील दिपस्तंभामध्ये राहणं अपेक्षित आहे. या दिपस्तंभाला वरचेवर वादळाचे तडाखे बसत असतात. मात्र अशा स्थितीमध्येही या दिपस्तंभात कधी अंधार पडता कामा नये याची जबाबदारी या केअरटेवर असेल. या ठिकाणी अती प्रचंड लाटा येत असतात. सतत या दिपस्तंभाला अनेक फूटांच्या लाटा धडका देतात. कधीतरी हा दिपस्तंभ अर्ध्याहून अधिक पाण्याखालीही असतो. अशा आव्हानात्मक स्थितीमध्ये तिथे राहणं या केअरटेकरच्या जीवावरही बेतू शकतं. 

...म्हणून कोणी कामाला तयार नाही

या ठिकाणी एवढा पगार असूनही ही नोकरी कोणीही नोकरी स्वीकारत नाही. येथील परिस्थिती फारच धोकादायक असून कामाचं स्वरुप पाहता एकट्यालाच या ठिकाणी रहावं लागेल. म्हणूनच केवळ बटण दाबून इलेक्ट्रीक दिवे चालू-बंद करण्याचा कोणी हा जॉब स्वीकारत नाही, असं दिसतंय.