रशिया : रशियातील सर्वात थंड शहर असलेल्या याकुट्समधील नागरिक हैराण झाले जेव्हा त्यांना आकाशातून सोन्याचा पाऊस पडल्याची गोष्ट समजली.
शहरातील पोलीसही अॅक्टीव्ह होऊन शोध मोहिम सुरू झाली. आकाशातून सोनं कस काय पडू शकत हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. लवकरच यामागची सत्यता समोर आली.
याकुट्स एअरपोर्टवरील कार्गो विमान ३ हजार किलो सोनं घेऊन कुठेतरी चालल होतं. पण टेकऑफच्या काही वेळातच कार्गोच्या खालचा गेट तुटला आणि आकाशातून भरभरून सोनं जमिनिवर पडू लागलं.
मीडिया रिपोर्टनुसार टेकऑफनंतर पायलेटला समस्या कळाली. त्याने तात्काळ लॅंडिंग करण्याचा निर्णय घेतला. पण एवढा वेळ रनवे वर असूनही पुढची २६ किमी पर्यंत सोन पसरलं
एका गोल्ड कंपनीद्वारे फिनिशिंगसाठी सोनं नेलं जात होतं. यामध्ये सोन्यासोबतच अरबो रुपये किंमतीचे हिरेही होते.
'सायबरियन टाइम्स' ने दिलेल्या वृत्तानुसार प्लेन जिथे जिथे गेलं तिथल्या रनवे पासून हायवे पर्यंत पोलिसांनी सील करुन शोधमोहीम सुरू केलीए. यामूळे जास्तीत जास्त सोनं शोधण्यास मदत होणार आहे.