Russia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष

सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले.

Updated: Nov 1, 2022, 03:39 PM IST
Russia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष title=

Ukraine War Updates: गेल्या वर्षभरापासून युक्रेन आणि किवमध्ये (Kyiv) रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे आणि घुसखोरीमुळे आधीच येथील नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा येथील नागरिकांना रशियाची हल्ल्याची झळ पुन्हा एकदा लागली आहे. रशियानं ईशान्य युक्रेनियन शहर खार्किव आणि चेरकासीच्या मध्य प्रदेशातील मुख्य पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्रांच्या मदतीनं हल्ला केला आहे. या हल्लामुळे जवळपास 80 टक्के कीव रहिवाशांना वीज पुरवठा खंडित (Electricity rates today) झाल्यानं आणि पाणी कपात झाल्यानं मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागतो आहे, अशी माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. समोर आलेल्या एका वृत्तानुसार, रशियानं युक्रेनला त्याच्या ब्लॅक सी फ्लीटवर ड्रोन हल्ल्यासाठी दोषी ठरवल्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला आहे. (russia ukraine war updates major water and electricity shortage occurs shortly after russia missile strikes)

सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले. अनेकांची वीज गेली तसेच रशियाच्या या अचानक हल्ल्यांमुळे वीज खंडित झाल्याचे राजधानीचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी टेलिग्रामवर सांगितले. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी युद्धग्रस्त देशातील नागरिकांना पाण्याचा साठा करण्याचे आवाहन केले आहे कारण परिस्थिती अधिकच बिकट आहे. 

युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकआऊट आहे आणि रहिवाशांना तीव्र पाणी टंचाई सतावते आहे. या हल्ल्यामुळे राजधानीतील 350,000 घरांवर चालणाऱ्या ऊर्जा सुविधेला धडक बसली आहे. सध्या राजधानीत आपत्तीकालीन व्यवस्था सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. झाफोरिझ्झियाच्या दक्षिणेकडील प्रदेशातही संप सुरू झाला आहे. 

खार्किवचे महापौर (Mayor) इहोर तेरेखोव्ह यांनी टेलिग्रामवर सांगितले की, दोन क्षेपणास्त्रांनी शहरातील एका गंभीर पायाभूत सुविधेवर आघात केलाय. गंभीर पायाभूत सुविधांना फटका बसल्यानंतर चेरकासी प्रदेशातील काही भागांची वीज गेली आहे, असे प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख इहोर टॅबुरेट्स यांनी सांगितले. कीवमध्ये आठवड्याच्या शेवटी रशियन हल्ल्यांमुळे वीज खंडित होणे सुरूच होते.

क्लिट्स्को यांनी सांगितले की इलेक्ट्रिकल सिस्टम दुरुस्त करण्यासाठी आठवडे लागतील. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की रशियाचे देशव्यापी ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्र हल्ले युक्रेनच्या हिवाळा सुरू असताना महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले जात आहेत, असे सीएनएनने (CNN) वृत्त दिले आहे.

CNN ने युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबाच्या हवाल्याने सांगितले की, कीवने आधीच जनरेटरसह सुमारे 1,000 युनिट पॉवर (Unit Power) उपकरणे मिळविण्यासाठी किमान 12 देशांशी करार पूर्ण केले आणि देश सध्या युरोपियन युनियन (EU) आणि नाटो (NATO) च्या संपर्कात आहे.