Shocking Video : मृत्यूच्या दारातून परत आली तरूणी, हिंमत असेल तरच व्हिडीओ पाहा!

Shocking Shark Video :  देव तारी त्याला कोण मारी? ही प्रसिद्ध म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. समुद्रातील शार्कशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. शार्क (Shark) म्हणजे पाण्याचा बादशाह... 

Updated: Oct 28, 2022, 11:34 PM IST
Shocking Video : मृत्यूच्या दारातून परत आली तरूणी, हिंमत असेल तरच व्हिडीओ पाहा! title=
Shocking Shark Video

Viral Shark Video : देव तारी त्याला कोण मारी? ही प्रसिद्ध म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. एखाद्या व्यक्ती मृत्यूच्या दारातून परत आलेल्या घटना देखील पाहिल्या असतील. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. जो पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

समुद्रातील शार्कशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. शार्क (Shark) म्हणजे पाण्याचा बादशाह... अनेकदा साहसी पाणबुड्यांना शार्कच्या रागाचा त्रास सहन करावा लागतो. काहींचे त्यामध्ये जीव देखील गेले आहेत. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओत (Shocking Video) पाहायला मिळाला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आणखी वाचा - आंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video

शार्कच्या हल्ल्यात लोक जखमी झाल्याचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. असाच हा व्हिडीओ आहे. जिथं एक महिला शार्कच्या तोंडात जाणार होती, पण नशिबानं तिला साथ दिली अन् तिचा जीव वाचला, पण थोडा जरी उशिर झाला असता तर ती मुलगी पुन्हा जिवंत राहिली नसती.

पाहा व्हिडीओ - 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की एक महिला स्कूबा डायव्हर समुद्रात डायव्हिंगसाठी उतरणार होती. तिने समुद्रात पाय ठेवताच तिला पाण्यात काही हालचाल दिसते. जे पाहून तिला धक्का बसतो, पण पाण्यात कोण आहे हे समजताच तिने पाय मागे खेचले. मुलीने पाय ओढताच शार्क पाण्याखालून बाहेर येते आणि तोंड उघडून तिला खाण्याचा प्रयत्न करते. पण ती थोडक्यात बचवल्याचं दिसतंय.