ऍनिमेटेड प्रपोजलमधून त्याने विचारलं, 'माझी होशील का....?'

हे सारं पाहून प्रेयसीची प्रतिक्रिया अशी की....    

Updated: Jan 13, 2020, 09:35 PM IST
ऍनिमेटेड प्रपोजलमधून त्याने विचारलं, 'माझी होशील का....?'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : प्रेमासाठी आणाभाका घेणारे काही कमी नाहीत. मुळात ही भावनाच अशी आहे, ज्यामध्ये आपल्या जोडीदारासाठी कित्येकदा लोकं असं काही करुन जातात जे इतरांना हेवा वाटणारं असतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रेमाची गोष्ट अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. कारण, यामध्ये प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रियकराने त्याच्या प्रेयसीसाठी थेट अतिशय लोकप्रिय कार्टूनचीच मदत घेतली आहे. 

तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि त्याचा सुरेख वापर करत प्रेयसीला प्रपोज करणारा हा अवलिया आहे, Lee Loechler. १९५९च्या काळात अतीशय गाजलेल्या अशा  डिस्नेच्या 'स्लिपिंग ब्युटी' Sleeping Beauty या कार्टून फिल्ममध्ये त्याने चक्क स्वत:ला आणि प्रेयसीला एका वेगळ्या रुपात साकारलं. 

मागील सहा महिन्यांपासून kayla coombsच्या साथीने त्याने आपल्या प्रेयसीसाठी ही खास आणि तितकीच अविस्मरणीय भेट देण्यासाठीची तयारी सुरु केली. एका युट्यूब व्हिडिओतून त्याने केलेली ही किमया अनेकांची मनं जिंकत आहे. सोशल मीडियावर Leeचं हे प्रपोजल पाहिल्यानंतर त्याच्या प्रेयसीची म्हणजेच Sthutiची प्रतिक्रियाही अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरत आहे. 

कला आणि भावनांचा सुरेख मेळ साधत साकारण्यात आलेल्या या ऍनिमेटेड प्रपोजलमध्ये एक दृश्य असं येतं जेव्हा पडद्यावरील पात्र त्याच्या हातातून अंगठी उडवतं आणि ती अंगठी थेट Leeच्या हातात येऊन पोहोचते. हे सारंकाही पाहताना अनेकांकडून नकळतपणे उत्स्फूर्त अशा प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.