टेक्सास : प्रत्येक जोडप्याला पालक होण्याचा अनुभव घ्यायचा असतो. आपल्याही घरात चिमुकली पावलं धावावी अशी इच्छा असते. टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचीही अशीच इच्छा होती. आनंदाची बाब म्हणजे, त्यांची ही पुर्ण झाली खरी...पण यानंतर आई-बाबा झाल्यानंतर त्यांची पुरती दमछाक झाली आहे.
या दाम्पत्याला एक, दोन नव्हे तर तब्बल पाच मुलं झाली. 29 वर्षांची असताना ब्रेंडा रेमुंडो 5 मुलांची आई झाली आहे. ब्रेंडा ही दुर्मीळ मातांपैकी एक मानली जाते कारण तिला एकाच वेळी 5 मुलं झाली. अशा मुलांना क्विंटुप्लेट्स (Quintuplets) असं म्हटलं जातं.
ब्रेंडा रेमुंडोला यापूर्वीच आई होण्याची इच्छा होती. मात्र काही गुंतागुंत असल्याने तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. यानंतर ती गरोदर राहिली आणि तिने 5 मुलांना जन्म दिला आहे.
ब्रेंडाच्या पोटात एकाच वेळी तिच्या पोटात 5 मुलांना वाढवत होती. जेव्हा रुग्णालयातील कर्मचार्यांना हे कळलं तेव्हा त्यांच्यासाठी ही आश्चर्यचकारक घटना होती. पार्कलँड मेमोरियल हॉस्पिटलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ पाच क्विंटपलेटची (Quintuplets) नोंद आहे. याच रूग्णालयात ब्रेंडाची प्रसूती झाली.
दरम्यान या 5 बाळांच्या जन्मानंतर त्यांना काही काळ इनक्यूबेटरमध्ये ठेवावं लागलं. यावेळी ब्रेंडा आणि तिचा नवरा अलेजांद्रो इबारा त्यांना दूध पाजण्यासाठी रोज रूग्णालयात जात होते. या बाळांना 1-1 करून घरी आणण्यात आलं. गेल्या वर्षी 17 मे रोजी या मुलांचा जन्म झाला होता. त्यानंतर 30 जुलैपर्यंत सर्वांना घरी आणलं गेलं.