बँकॉक : थायलंडमध्ये ब्रिटेनच्या एका महिला पर्यटकाने बलात्कारासंबंधित फेसबुक पोस्ट शेअर केल्यानंतर पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. या महिलेन दावा केला आहे की, जेव्हा ती तिच्यासोबत झालेली अत्याचाराची तक्रार नोंदवण्यासाठी गेली तर पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.
वेगवेगळ्या प्रांतामधून या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. चुकीची माहिती पसरवल्याने आणि राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवल्यामुळे पोलिसांना या 12 जणांना अटक केली. या आरोपींना 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी या महिलेने केलेल्या आरोपांचं खंडन केलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर जूनमध्ये कोह ताओ द्वीपवर महिलेवर बलात्कार झाल्याचा दावा खोटा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
इंग्लंडला परत आल्यानंतर 19 वर्षीय महिलेने पत्रकारांना सांगितलं की, तिच्या ड्रिंकमध्ये काही तरी मिसळून तिला पाजण्यात आलं. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती एका बीचवर होती. तिच्यावर बलात्कार आणि लूट झाल्याचा दावा महिलेने केला होता.
महिलेने शेअर केलेली फेसबूक पोस्ट या 12 जणांनी शेअर केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. चुकीची माहिती पसरवल्यामुळे त्यांना अटक झाली. परदेशात राहणाऱ्या 2 आणखी व्यक्तींविरोधात ही पोलिसांनी अरेस्ट वॉरंट काढलं आहे.