Boeing Aircraft Loses Tyre in Air: विमानात बिघाड होऊन अपघाचे झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विमानानं उड्डाण घेताच विमानाचं चाक तुटल्याचं दिसत आहे. तसेच चाकाला आग लागल्याचंही दिसून येतं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. शेवटच्या क्षणी या विमानासोबत नेमकं काय घडलं, हे सर्वकाही या व्हिडीओत दिसून येतं आहे. अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ही घटना इटलीतील टारंटो विमानतळावरची आहे. अॅटलस एअरचे ड्रीमलिफ्टर बोईंग 747 विमानाने (Boeing Aircraft) टेक ऑफ करताच त्याचा मुख्य लँडिंग गियर टायर विमानापासून वेगळा झाला. कदाचित विमानात बसलेल्या कर्मचार्यांना याबाबत माहित नव्हतं. मात्र त्यांना नंतर याबद्दल सांगण्यात आलं.
संबंधित माहिती मिळताच प्लेनमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानात बसवलेल्या इतर चाकांच्या मदतीने त्याचे अमेरिकेत लँडिंग करण्यात आले. प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, कार्गो विमानाने अमेरिकेतील चार्ल्सटन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. सध्या या अपघाताचं कारण अस्पष्ट आहे.
Un Boeing 747 Dreamlifter operat de Atlas Air (N718BA) care a decolat marți dimineață (11OCT22) din Taranto (IT) spre Charleston (SUA) a pierdut o roată a trenului principal de aterizare în timpul decolării.
Avionul operează zborul #5Y4231 și transportă componente de Dreamliner. pic.twitter.com/R95UHkLD7V
— BoardingPass (@BoardingPassRO) October 11, 2022
विमानापासून वेगळ्या झालेल्या टायरचं वजन सुमारे 100 किलो आहे. विमानतळाजवळील एका द्राक्षबागेत हा टायर सापडला. या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने लँडिंगवेळी अपघात झाला नाही असंच म्हणावं लागेल.