Trending Video: धक्कादायक! अणुबॉम्ब स्फोट झाल्यानंतर हृदय पिळवटून टाकणारा Video

Trending Video: या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो सुमद्र किनाऱ्याचं नयनरम्य दृष्यं या स्फोटानंतर एका क्षणात बदलून जातं. 

Updated: Oct 7, 2022, 05:59 PM IST
Trending Video: धक्कादायक! अणुबॉम्ब स्फोट झाल्यानंतर हृदय पिळवटून टाकणारा Video title=
Trending Atomic bomb Video Viral on Social media

Atomic bomb Video: जगात सगळ्यात भयंकर अस्त्र कोणतं असं विचारलं तर त्याचं उत्तर असले अणुबॉम्ब (Atomic bomb). या अणुबॉम्बचे दुष्परिणाम जगाने अनुभवले आहेत. दुसऱ्या महायुद्धात (World War II) या भयंकर अस्त्राचा वापर करण्यात आला. याची झळ जपान (Japan) अजून सोसतोय. याची तीव्रता किती असेल याची कल्पना न केलेली बरी. क्षणात सगळं जग होत्याचं नव्हतं होत्यं...

अणुबॉम्ब हे जगातील सर्वात धोकादायक शस्त्रांपैकी एक आहे, जे केवळ आणि फक्त विनाश आणते. अणुबॉम्बमध्ये एवढी शक्ती असते की तो संपूर्ण शहर नष्ट करू शकतो. याचे पहिले उदाहरण 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने (America) जपानवर हल्ला केल्यावर पाहायला मिळाले. हिरोशिमा (Hiroshima) शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. शहराच्या मध्यभागी जेव्हा बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा तापमान अचानक दहा लाख सेंटीग्रेडपर्यंत पोहोचल्याचे सांगितलं जातं. (Trending Atomic bomb Video Viral on Social media)

अणुबॉम्बच्या स्फोटाचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा सोशल मीडियावर ट्रेंड (Trending) होतं असलेला व्हिडीओ पाहून विनाश म्हणजे काय याची कल्पना येते. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो सुमद्र किनाऱ्याचं नयनरम्य दृष्यं या स्फोटानंतर एका क्षणात बदलून जातं. 

हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Dr. Zubair Iqbal Ghouri यांनी आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ virtual reality असल्याचं सांगितलं जातंय.