चिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video

Viral Video  :  गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत.  असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...

Updated: Dec 19, 2022, 03:59 PM IST
चिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video title=
trending video One dog attack on child and other dog saved his life viral on Social media nmp

Dog Attack :   कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये (Dog Attacks ) दिवसेंदिवस वाढ होतं आहे. नोएडा (Noida) आणि गाझियाबादमधील (Ghaziabad ) लिफ्टमध्ये पाळीव कुत्राच्या हल्ला (pet dog attack) झाल्याचा दोन घटना समोर आल्या होत्या.  आता सोशल मीडियावर अजून एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक चिमुकल्यावर भरदिवसा मैदानात खेळत असताना हल्ला केला आहे. 

एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकल्या मैदानात आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत होता. एवढ्यात एका काळा रंगाच्या कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला केला. हे पाहताच पाळवी कुत्र्याने आपल्या बाल मित्राचा जीव वाचविण्यासाठी त्या काळ्या कुत्र्यावर हल्ला चढवला. तुम्ही बघू शकता जसा तो पाळीव कुत्रा त्या दुसऱ्या काळ्या कुत्र्यावर हल्ला करतो तिथे अजून एक काळा रंगाचा कुत्रा येतो. अचानक कुत्र्या हल्ल्यानंतर चिमुकल्या घाबरून पळू लागतो. 

 

हेसुद्धा वाचा - Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल

 

असा पण एक मित्र 

कुत्र्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या चिमुकल्या धावत जात आईच्या कुशीत जाऊन स्वत:ला सुरक्षित समजतो. त्या काळा कुत्र्याचा मालक पण लगेचच तिथे येतो आणि कुत्र्याला घेऊन जातो. (trending video One dog attack on child and other dog saved his life viral on Social media)

आयुष्याचा दोन बाजू 

कायम म्हटलं जातं प्रत्येक गोष्टीची दोन बाजू असते जसं विसाळलेल्या कुत्रा चिमुकल्यावर हल्ला करतो तर दुसरीकडे पाळीव कुत्रा आपल्या चिमुकल्या मित्राचा जीव वाचवतो. जर कुत्र्यांचा हल्लाच्या बातम्या समोर येतं असल्या तरी दुसरीकडे कुत्र्यांचे अनेक चांगले चांगले व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sandey_club_animlov या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

श्वानचा स्वॅगचं वेगळा!

काही दिवसांपूर्वी आपण भक्तीत एकदम तल्लिन झालेला हा श्वान मोठ्या जल्लोषात मंदिरातील घंटी वाजवत असतानाचा व्हिडिओ आपण पाहिला आहे. घंटी वाजवल्यामुळे जो आवाज घुमतो त्यासाठी तो श्वान खूप वेडा आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

मनं प्रसन्न करणारा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जीएसडी कॉलनी नावच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमधील दिसणारा हा श्वान एक जर्मन शेफर्ड आहे. देवाच्या भक्तीत मग्न होऊन घंटी वाजविणारा हा व्हिडीओ सर्वांचे मनं जिंकतोय.