अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासेम सुलेमानी ठार

महत्त्वाचं म्हणजे, कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला. 

Updated: Jan 3, 2020, 02:35 PM IST
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासेम सुलेमानी ठार title=

बगदाद : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने रॉकेट हल्ला करून इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं. कासीम सुलेमानी यांचा ताफा बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठजण ठार झाले. 

हादेश अल शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहली अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने इराणचे टॉप कमांडर मेजर कासेम सुलेमानी यांना ठार केलं आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला.