महिला वेटरनं पतीला 'स्विटहार्ट' म्हटल्यावर पत्नीचा पारा चढला; बदल्यात अशी Tip लिहून दिली की...

Viral Dont Call My Husband Sweetheart Note:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका महिलेनं चक्क आपल्या पतीला वेट्रेसनं स्वीटहार्ट म्हटलं म्हणून जो राग आला तो तिनं चक्क बिलावर असं काही लिहिलं की त्या वेट्रेसला त्याचा बरोबर संदेश मिळाला. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 25, 2023, 03:55 PM IST
महिला वेटरनं पतीला 'स्विटहार्ट' म्हटल्यावर पत्नीचा पारा चढला; बदल्यात अशी Tip लिहून दिली की...
Viral news Dont Call My Husband Sweetheart Note after flirting with her husaband

Viral Dont Call My Husband Sweetheart Note: नवरा बायकोचं नातं हे फार वेगळं असतं. त्यातून आपल्या बायकोला कोणी दुसऱ्यानं प्रेमानं जरी हाक मारली तरीसुद्धा आपल्याला राग आल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यावेळी एका हॉटेलमध्ये गेलेल्या जोडप्याची चर्चा आहे. त्याच्या नवऱ्याला वेटरनं स्वीटहार्ट म्हटलं म्हणून पत्नीला प्रचंड राग आला आणि चक्क टीपच्या ऐवजी तिनं तिथे लिहून ठेवलं की माझ्या पतीला स्विटहार्ट बोलायचं नाही. सध्या बिलवर लिहिलेलं हे वाक्य चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी नेटकरीही नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी आपलेही अनेक अनुभव सांगितले आहे. 

नक्की हा प्रकार काय आहे हे आपण पाहुया. आपण अनेक रेस्टोरंटमध्ये एकत्र फॅमिलीसह जेवायला जातो. खासकरून पती पत्नी एकमेकांसोबत डेटवरही जाताना दिसतात. अशावेळी जरी आपण हॉटेलमध्ये असलो तरीसुद्धा पती पत्नी यांना एकत्र वेळही हवा असतो. अशा वेळेला कोणीही मध्ये कबाब की हड्डी नसेल तर त्या पती पत्नींनाही बरं वाटतं. त्यातून जास्त त्रास तर पत्नीलाच होतो आणि समजा कोणी पतीची मैत्रीण किंवा त्याची कलिगही मध्येच टपकली तरी मात्र पत्नींची जळफळाट होते. त्यामुळे अशावेळी पतीला सगळं सांभाळून घ्यावे लागते. यावेळी वेटर, वेट्रेस आणि हॉटेलमधील इतरांच्या चुकीच्या वागणुकीचाही ग्राहकांना त्रास होऊ शकतो. 

हेही वाचा : 'आलूजी...' पापाराझींनी हाक मारल्यावर आलियाचा पारा चढला; Video पाहा

Imgur या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @dickwitfo या अकांऊटवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्याची सध्या बरीच चर्चा आहे. हे 32.76 डॉलर इतकं आहे. ज्याची सध्या जोरात चर्चाही आहे. हा फोटो परदेशातला आहे हे यावरून समजते. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. यावेळी अनेकांनी या पोस्टवर कमेंट करायला सुरूवात केली आहे. एकानं तर असं लिहिलंय की, ही पत्नी कित इन्सिक्युअर आहे. 

अनेकदा असे व्हिडीओवरही व्हायरल होताना दिसतात. त्यातल सध्या या पोस्टनंही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओचीही बरीच चर्चा असते. असे व्हिडीओ हे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसतात. त्याच्यावर अनेक जणं हे कमेंट्स करताना दिसतात. त्यामुळे असे व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होत असतात. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x