US Highway shocking video: आयुष्यात अशा अनेक अनपेक्षित घटना (Unexpected events) घडतं असतात, जे पाहून आपले डोके चक्रावून जातात. कल्पनेच्या पलिकडे आणि धक्कादायक घटना (Shocking incident) अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद (Caught on camera) होतात. असाच एक महामार्गावरील (highway) अंधारीतील शॉकिंग व्हिडीओ (Shocking video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांची झोप उडवताना दिसतं आहे. (Viral video deer shocking jump fast moving car on Social Media NM)
हा Trending Video पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महामार्गावर काळोखात अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. अशातच एका कारसमोर एक हरीण (deer) खूप उंच उडी मारून वाहनावरून रस्ता ओलांडते. अचानक तीन हरिण रस्ता ओलांडतात आणि हा धक्कादायक व्हिडीओ समोरून येणाऱ्या वाहनात बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहिले हरण सहज रस्ता ओलांडते, दुसरे हरण उडी मारते (Dear long Jump) आणि तिसरे सुद्धा रस्ता ओलांडते. हे दृश्य बघून आश्चर्यचकित व्हायला होतं.
#DeerLeapsOverCar
Fall has arrived, with that comes the infamous increase of crossings. Watch here as Tpr. Anderson encounters a small herd & uses quick braking to avoid contact.Reminder: If deer cross your path - apply controlled braking; steer straight; don’t swerve. pic.twitter.com/5NtQ6KBe5o
— MSP Fifth District (@MspSouthwestMI) September 22, 2022
हा 18 सेकंदांचा व्हिडिओ अमेरिकेतील (America) मिशिगन राज्याच्या पाचव्या जिल्हा पोलिसांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की, वेगवान वाहने निघून जाण्याची वाट पाहण्याऐवजी या सर्वांनी आपल्या ताकदीवर भरवसा ठेवला आणि माणसांना आव्हान देत पुढे गेले.