Viral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

Viral Video : एका कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या घटनेनंतर त्या चालकावर...

Updated: Apr 14, 2023, 08:22 AM IST
Viral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल title=
viral video Uber driver caught Misbehaving with a drunk woman trending Video on Social media

Uber Driver Viral Video : एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. जगातील माणुसकी हरवत चालली आहे. महिलांशी गैरवर्तणुकीचे अनेक धक्कादायक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. विकृत विचाराची लोक आजही या जगात वावरत आहे. मग अशावेळी कुठली ना कुठली महिला या विकृत लोकांची शिकार होतं आहे. 

भय इथलं संपत नाही!

या धक्कादायक व्हिडीओने कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या व्हिडीओमध्ये एका कॅब ड्रायव्हरने महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि त्यानंतर या विकृत व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला. (viral video Uber driver caught Misbehaving with a drunk woman trending Video on Social media ) 

विकृत वृत्ती कधी नष्ट होणार ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे. एक महिला कॅबमध्ये मागच्या सीटवर नशेच्या अवस्थेत आहे. या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी कॅब ड्रायव्हर अंधारात गाडी उभी करतो आणि मागच्या सीटवर जातो. महिलेसोबत गैरवर्तन करायला लागतो. 

मात्र त्या नराधमाच्या लक्षात आलं नाही, की त्याने कार एका घरासमोर लावली आहे. घरातील एका व्यक्तीच्या लक्षात आलं की, काही तरी धक्कादायक कृत्य घड आहे. तो व्यक्ती मोबाईलचा कॅमेऱ्या सुरु करुन गाडीजवळ गेला आणि खिडकीच्या काचेवर टॅप केलं. 

उबर ड्रायव्हर घाबरला आणि त्याने पँटची झीप लावली आणि वरती घेतली, आणि खाली उतरत समोरच्या सीटवर जाऊन बसला. चालकाचं हे अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. त्या व्यक्तीचा सतर्कतेमुळे महिलेचा सुरक्षीत होती. तो चालक त्या व्यक्ती सतत सॉरी म्हणत होता. 

त्यानंतर त्या व्यक्ती विचारलं, ''तू काय करत आहेस? तू काय करतोस भाऊ? इथे माझी लहान मुलं आहेत. हे दृष्श कर्म तुला कसं सुचलं.'' ही घटना रोशडेल शहरात इस्टर संडेच्या रात्रीची आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी ओल्डहॅमच्या 37 वर्षीय मोहम्मद जमालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर उबरने चालकावर बंदी घातली आहे. 

हेसुद्धा वाचा - Viral Video : रिसेप्शन पार्टीमध्ये नवरदेवाने वधूचं अफेयरचा व्हिडीओ सगळ्यांसमोर लावला अन् मग...

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरत आहे. @InsaneRealitys नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करणात आला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या चालकावर कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.