Viral Video: सोशल मीडिया हा अनेक वेगवेगळ्या व्हिडीओंचा खजिना आहे. निसर्गाचा चमत्कार दाखवणारे पण अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक वेगळा भयानक आणि थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो एका शक्तिशाली वादळाचं रौद्ररुप आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वाळूच्या वादळाचं उंच असं अफाट वादळ येताना दिसत होतं. रस्त्यावर असलेल्या लोकांना डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. चीनच्या Qinghai प्रांताचा मोठा भाग या वादळाने व्यापला होता. मीडिया रिपोर्टनुसार वादळाच्या दरम्यान विजिबिलिटी ही 100 मीटरवरुन थेट शून्यावर आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये अशा वादळाची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वादळाचं रौद्ररुप पाहून लोक कॅमेरा सोडून आपलं जीव वाचविण्यासाठी आहे तिथे जमिनीवर बसले. AccuWeather च्या अहवालानुसार, गेल्या बुधवारी उत्तर-पश्चिम चीनमध्ये धुळीचे शक्तिशाली वादळने धुमाकूळ घातला होता. यातील सगळ्यात भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका वाळूच्या वादळाने संपूर्ण परिसराला वाळवंटात बदलून टाकलं होतं. या व्हिडीओमधील वादळाचं भयावह रुप पाहून अंगावर शहारा येतो. तुम्ही या व्हिडीओ पाहू शकता की, हे वादळ मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, रोडवरील गाड्यांना आणि लोकांना जणू काही गिळायला येत आहे.
Dramatic video of a massive sandstorm ripping through China's Qinghai province has emerged on social media | WATCH #ITReel #China #Sandstorm #Qinghai #Twitter #nature pic.twitter.com/pv4NWgCW4g
— Rasmus (@notorius_vip) July 24, 2022
भीषण उष्णतेने चीन बेहाल
युरोपप्रमाणे चीनसुद्धा उष्णतेशी झुंज देत आहे. चीनमध्ये जूनपासून मोठ्या प्रमाणात पारा झपाट्याने वाढत चालला आहे. विशेष म्हणजे कमाल तापमानाने विक्रम मोडला आहे. चीनच्या हवामान खात्याने इशारा दिला आहे. पुढील अजून काही दिवस तरी चीनला उष्णतेशी दोन हात करावा लागणार आहे. यंदा युरोपमध्येही अभूतपूर्व उष्णता पाहायला मिळाली. उष्णतेच्या लाटेपासून ते स्पेन, फ्रान्स, ग्रीसपर्यंत वाईट स्थिती आहे.