प्योंगयांग : रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपल्या खेळाडूंना स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा भलताच नाराज झाला आहे. त्यामुळे पराभूत खेळाडूंना शिक्षेला जामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सूत्रांची माहिती अशी की, हुकुमशाहा किम जोंगला अपेक्षित होते की, यंदाच्या रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपले खेळाडू ५ सूवर्ण पदकांसह १७ पदके घेऊन येतील. पण, वास्तवात असे न घडता ऑलिम्पीकमध्ये उत्तर कोरियाला केवळ ७ पदकांवरच समाधान मानावे लागले.
उत्तरकोरियाने रिओ ऑलिम्पिकमध्ये एकूण ३१ खेळाडू पाठवले होते. तसेच, या स्पर्धेत उत्तरकोरियाने केवळ सात पदके जिंकली. ज्यात २ सूवर्ण, ३ रौप्य आणि २ कास्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वी लंडन ऑलिंम्पीकमध्ये उत्तरकोरियाची कामगिरी चांगली होती. लंडनमध्ये उत्तरकोरियाने ४ सूवर्ण पदकांची कमाई केली होती.
न्यूज वेबसाईट फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरकोरियाचे खेळाडून स्पर्धेदरम्यान प्रचंड दबावाखाली होते. त्यांना भीती होती की, आपल्या खराब कामगिरीमुळे किम जोग नाराज होईल. त्यामुळे त्याच्या नाराजीचा फटका बसून आपल्याला मिळणाऱ्या सोई सवलती बंद होतील. इतकेच नव्हे तर, पराभवाची शिक्षा म्हणून कोळशाच्या खाणीतही कमा करावे लागू शकेल.