जेव्हा भररस्त्यात दिसला प्राणघातक अजगर, तो व्यक्ती त्याच्या बाजुला जाऊन का झोपला

जेव्हा अजगराच्या बाजुला जाऊन झोपला तो व्यक्ती

Updated: Jun 9, 2017, 04:12 PM IST
जेव्हा भररस्त्यात दिसला प्राणघातक अजगर, तो व्यक्ती त्याच्या बाजुला जाऊन का झोपला title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा राहणाऱ्या ट्रेसी हॅमबर्जरने त्याच्या फेसबूक अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पायथनच्या बाजुला झोपलेला दिसत आहे. त्याचं नाव मॅथ्यू बॅगर आहे. असं काय झालं की त्याला अजगराच्या बाजुला झोपावं लागलं.

ऑस्ट्रेलियामध्ये पिलबरा रिक ऑलिव हा अजगर खूपच प्राणघातक मानला जातो. याला पाहताच इतर जीव-जंतु देखील रास्ता बदलून टाकतात. मॅथ्यू बॅगर न घाबरता त्याच्या बाजुला झोपतांना दिसत आहे. मात्र तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

रस्ता पार करतांना कोणतं वाहन त्याच्यावरुन जाऊ नये म्हणून मॅथ्यू रस्त्यावर झोपला. कारण त्यामुळे कोणतंही वाहन त्याच्यावरुन गेलं नसतं.