Health News : जगाची चिंता वाढवणारी बातमी! वंधत्त्वाचं प्रमाण वाढलं, आकडेवारी पाहाच

Health News : जागतिक आरोग्य संघटनेकडून विविध स्तरांवर काही अहवाल सातत्यानं सादर करण्यात येतात. अशाच अहवालांपैकी एकामुळं अनेकांचीच चिंता वाढवली आहे. कारण, यामध्ये नमूद केलेली माहिती कळत नकळत सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम करणारी.   

Updated: Apr 5, 2023, 03:00 PM IST
Health News : जगाची चिंता वाढवणारी बातमी! वंधत्त्वाचं प्रमाण वाढलं, आकडेवारी पाहाच   title=
WHO published report on increasing infertility rate latest health news in marathi

World Infertility Rate: तिथे कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यातून बाहेर येत सर्वसामान्य आयुष्या जगण्यासाठी धडपड करणाऱ्या जगभरातील नागरिकांच्या प्रयत्नांना अपयश येताना दिसत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेकडून अतिशय महत्त्वाचा आणि काहीसा चिंतेत टाकणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामुळं तुमचीही चिंता वाढू शकते. जगभरातील महिला आणि पुरुष यांच्या वंधत्त्वाविषयीचा हा अहवाल असून, त्यातून समोर आलेली माहिती हादरवणारी आहे. (WHO published report on increasing infertility rate latest health news in marathi )

जगभरात दर सहावी महिला किंवा पुरूष सध्याच्या घडीला वंधत्त्वाच्या समस्येचा सामना करत आहेत. WHO नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जगभरातील एकूण लोकसंख्येच्या 17.5 टक्के प्रौढ व्यक्तींना वंधत्त्वाची सस्या सतावत आहे. इथं धक्कादायक बाब म्हणजे, विकसीत देशांमध्ये हे प्रमाण 17.8 टक्के आणि विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण 16.5 टक्के इतकं आहे. 

कशी मिळाली आकडेवारी? 

WHO नं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 1990 ते 2021 पर्यंतचे सर्व अहवाल वाचून ही अंतिम आकडेवारी मिळवण्यात आली आहे. यामध्ये 66 सर्व्हेक्षणं पती- पत्नींवर करण्यात आली होती. तर, 53 सर्व्हेक्षणं अविवाहित किंवा लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींवर करण्यात आली होती. यामध्ये 11 अशाही व्यक्तींचा समावेश होता ज्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. 

हेसुद्धा वाचा : तुम्हालाही Sitting Disease आहे का? यावर वेळीच मात करा, नाहीतर व्हाल गंभीर आजारांचे शिकार 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात 12.6 टक्के अशीही लोकं आहेत ज्यांना काही काळासाठी वंधत्त्वाची समस्या सतावते आणि पुढे जाऊन ते या समस्येवरही मात करतात. साधारण वर्षभरापर्यंत कोणत्याही गर्भनिरोधकाशिवाय गर्भधारणा होत नसल्यास तो किंवा ती वंधत्त्वाची शिकार असल्याचं गृहित धरलं जातं. 

वंधत्वावर मात करण्यासाठी भारत हा एक असा देश आहे, जिथून बरेच प्रयत्न करत वैद्यकिय सल्ला आणि  मदतीसाठी नागरिक पुढं येतात. थोडक्यात यामस्येवर तोडगा काढण्यासाठी जास्त खर्च भारतीय करत असल्याची माहितीही अहलावातून समोर आली आहे. भारतात मुलांच्या जन्माची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक जोडपी आवाक्याबाहेर खर्च करण्याचाही निर्णय घेताना दिसतात. यामध्ये IVF चा पर्याय निवडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. खासगी दवाखान्यांची वाट धरण्याला इथं अनेकजण पसंती देताना दिसतात.